News Flash

पदवीधर निवडणूक: तुकाराम मुंढेंना विरोध करणाऱ्या भाजपा उमेदवाराला नागपूरकरांनी पाडलं

जोशींना भाजपाचा बालेकिल्ला राखता आला नाही.

नागपूर हा भाजपचा बालेकिल्ला, परंतु त्याचे बुरूज ढासळू लागले आहेत. तेथे भाजपाला अपयश येऊ लागले आहे. विधानसभा निवडणुकीत शहर आणि जिल्ह्य़ात भाजपाची पीछेहाट झाली. त्यानंतरच्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाचा पराभव करून काँग्रेसने सत्ता मिळवली. वर्षभरातच नागपूर पदवीधर मतदारसंघही भाजपाला गमवावा लागला. नागपूर पदवीधर मतदारसंघाची रचना झाल्यापासून जनसंघ आणि नंतर भाजपने हा मतदारसंघ पारंपरिकदृष्टय़ा आपल्याकडे कायम राखला होता. परंतु काँग्रेसने यंदा तो प्रथमच जिंकला. नागपूर या गडातच भाजपचा १८ हजारांहून अधिक मतांनी पराभव झाला. नागपूरमध्ये माजी आमदार अनिल सोले यांच्याऐवजी संदीप जोशी यांना उमेदवार मिळवून देण्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला होता. पण जोशींना भाजपाचा बालेकिल्ला राखता आला नाही.

नागपूरमधील भाजपाच्या पराभवाची कारणमीमांसा सुरु आहे. सोशल मीडियावर नागपूरकर तर्कवितर्क लढवत आहेत. यामध्ये बरेच जण संदीप जोशी यांना पराभवाचं कारण मानत आहे. सोशल मीडियावर नागपूरकरांनी आपली मतं व्यक्त केली आहेत. महानगरपालिकेत तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांना जोशींनी जो त्रास दिला, त्याचे परिणाम त्यांनी या निवडणुकीत भोगले, असा सूर नागपूरकारांनी सोशळ मीडियावर लगावला आहे. तुकाराम मुंढे नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त असताना अगदी पहिल्या दिवसापासून महापौर-आयुक्त वाद सुरू झाला होता. तुकाराम मुंढे यांना अडचणीत पकडण्याची एकही संधी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी सोडली नव्हती. असाही आरोप नेटकऱ्यांनी केला होता.

पाहा नेटकरी काय म्हणाले?

महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनंतर नागरिकांतून झालेल्या पहिल्याच निवडणुकीत भाजपचा पार धुव्वा उडाला. विधान परिषदेच्या सहापैकी चार जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. नागपूर आणि पुणे या आपल्या पारंपरिक पदवीधर मतदारसंघांमध्ये भाजपचा पराभव झाला. नागपूर पदवीधर मतदारसंघाची रचना झाल्यापासून जनसंघ आणि नंतर भाजपने हा मतदारसंघ पारंपरिकदृष्टय़ा आपल्याकडे कायम राखला होता. परंतु काँग्रेसने यंदा तो प्रथमच जिंकला. नागपूर या गडातच भाजपचा १८ हजारांहून अधिक मतांनी पराभव झाला. नागपूरमध्ये माजी आमदार अनिल सोले यांच्याऐवजी संदीप जोशी यांना उमेदवार मिळवून देण्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला होता. काँग्रेसचे विजयी उमेदवार अभिजित वंजारी यांनी मतदार नोंदणीपासून प्रचार यंत्रणेत आघाडी घेतली होती. त्याचा त्यांना फायदा झाला. भाजपमध्ये शेवटपर्यंत उमेदवारीचा घोळ घातला गेला. पदवीधरांनी प्रथमच नागपूरमध्ये भाजपला नाकारले. जिल्हा परिषदेपाठोपाठ पदवीधर मतदारसंघही गमवावा लागल्याने नागपूरमध्ये भाजपसाठी सारे काही आलबेल नाही, हेच स्पष्ट झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 5, 2020 10:29 am

Web Title: nagpur sandeep joshi bjp tukaram mundhe nck 90
Next Stories
1 सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल, तर…; काँग्रेस नेत्याचा महाआघाडीतील नेत्यांना सूचक इशारा
2 लाज नावाची गोष्ट शिल्लक राहिलीये का पाहा; निलेश राणेंचा अजित पवारांवर निशाणा
3 एकटेच लढणार आणि जिंकणार ही चंद्रकांत पाटलांची खुमखुमी चांगलीच जिरली; शिवसेनेचा टोला
Just Now!
X