माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घरच्या मैदानावर मोठा धक्का बसला आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या निकालाचा कौल भाजपाच्या विरोधात गेला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या मूळ गावातही भाजपाला पराभवाला सामोरं जावं लागले आहे. येथे काँग्रेस उमेदवाराने विजय मिळवला आहे. नागपूरातील भाजपाच्या पिछेहाटीला बावनकुळे फॅक्टरला जबाबदार धरलं जातं असल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळेंना भाजपाने उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे भाजपाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादीनं सुरुंग लावला आहे.

नागपूर जिल्हा परिषदेच्या ५८ आणि १३ पंचायत समितीच्या ११६ जागांसाठी जिल्ह्य़ात मंगळवारी सरासरी ६७ टक्के मतदारांनी मतदारांचा हक्क बजावला होता. या निवडणुकीत झालेले भरघोस मतदान बघता धक्कादायक निकाल अपेक्षित होता. सकाळपासूनच धक्कादायक निकाल सुरू आहे. दुपारी एक वाजता हातात आलेल्या निकालानुसार, भाजपाने सहा जागांवर विजय मिळवला आहे. तर काँग्रेसने १२ आणि राष्ट्रवादीने सहा जागांवर विजय मिळवला आहे. शिवसेना आणि  शेकपाने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला आहे.

विजयी उमेदरांची नावे –
                      काँग्रेस 

  • तेलकामठी: पिंकी कैरोती
  • धापेवाडा: महेश डोंगरे
  • बडेगाव: छाया बनसिंगे
  • परथई:  शांता कुमरे
  • बोथिया: कैलाश राऊत
  • अरोली: योगेश देशमुख
  • गोधनी रेल्वे: ज्योती राऊत
  • कोराडी: ज्ञानेश्वर उर्फ नाना कंभाले
  • वडोदा: अवंतिका लेकूरवाळे
  • तारसा: शालिनी देशमुख

———————————–

राष्ट्रवादी काँग्रेस 

  • पारडसिंगा: चंद्रशेखर कोल्हे
  • रायपूर: दिनेश बंग
  • डिगडोह: सूचिता ठाकरे
  • येनवा: समीर उमप (शेकाप)

————————-

भाजपा:

  • बेलोना: बविता गजबेयेर
  • खेडा: मोहन माकडे
  • तारसा: कैलास बरबटे
  • गुमथळा: अनिल निधान
  • निलडोह: राजेंद्र हरडे
  • खात: राधा अग्रवाल