News Flash

आर्थिक विवंचनेला कंटाळून तलावात उडी मारून नागपूरच्या दाम्पत्याची आत्महत्या

दिनेश आणि योगिता कुर्यवंशी असे या दाम्पत्याचे नाव आहे.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

आर्थिक विवंचनेला कंटाळून नागपूर येथील एका दाम्पत्याने फुटाळा तलावात उडी मारून आत्महत्या केली. दिनेश आणि योगिता कुर्यवंशी असे या दाम्पत्याचे नाव आहे.
मंगळवारी रात्री कुर्यवंशी दाम्पत्य नेहमीपेक्षा लवकर झोपले होते. पहाटे घरात कुणालाच न सांगता ते बाहेर पडले. त्यांनी फुटाळा तलावात येऊन उडी मारली. दिनेश कुर्यवंशी यांची दुचाकी आणि दोघांच्या चपला तलावाच्या शेजारी सापडल्यामुळे दोघांनी आत्महत्या केल्याचा संशय बळावला होता. सकाळी पोलिसांनी शोध मोहीम राबवली तेव्हा दोघांचे मृतदेह फुटाळा तलावात आढळले.
मृत दिनेश कुर्यवंशी यांचे नागपूर येथील सुरेंद्रगड परिसरात छोटसे हॉटेल आहे. या व्यवसायाबरोबर ते या परिसरात बचत योजना चालवायचे. लोकांकडून दर महिना पाचशे, हजार रूपये गोळा करायचे. या ग्राहकांना ते आकर्षक व्याजही देत. यातून गोळा केलेली रक्कम कुर्यवंशी दाम्पत्य एका व्यक्तीकडे गुंतवत असत. मात्र त्या व्यक्तीने पैसे परत न केल्यामुळे लोकांकडून घेतलेले पैसे परत देणे कठीण झाले होते. सातत्याने पैशांसाठी होणारी विचारणा. यामुळे अखेर त्यांनी आत्महत्या केली. कुर्यवंशी दाम्पत्याने आत्महत्या केल्यामुळे अनेक गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2016 3:27 pm

Web Title: nagpurs husband wife commits suicide in futala lake
Next Stories
1 रस्त्यांच्या प्रश्नांबाबत शिवसेना आक्रमक
2 टॅब वितरणासाठी निधी आला कुठून – नवाब मलिक
3 शौचालय असलेल्या घरीच लेकी देणार
Just Now!
X