News Flash

वासनेची भूक मिटवण्यासाठी कुत्र्यांवर लैंगिक अत्याचार; नालासोपाऱ्यात एकाला अटक

मागील दहा दिवसांपासून करत होता कुत्र्यांवर अत्याचार

(प्रतिकात्मक छायाचित्र)

नालासोपारा मध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका विकृत युवकाने आपल्या वासनेची भूक मिटविण्यासाठी चक्क कुत्र्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. मागील १० दिवसापासून हा तरुण दोन कुत्र्यांवर अत्याचार करत असल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

नालासोपारा पश्चिम येथील निळेमोरे परिसरात एका २२ वर्षीय तरुणाने आपली वासनेची भूक भागवण्यासाठी चक्क २ कुत्र्यांवर मागील १० दिवसांपासून बलात्कार करत असल्याची माहिती प्राणीमित्र प्रेम गोराडिया यांनी दिली आहे. या युवकावर प्राणीमित्र मागील १० दिवसापासून पाळत ठेवून होते. पण कोणताही पुरावा सापडला नसल्याने त्यांनी यावर कोणतही कारवाई केली नाही. पण रविवारी दुपारी हा युवक कुत्रीला घेवून सुनसान ठिकाणी घेवून जात असताना एकाने व्हिडीओ रेकॉर्ड केला. त्यावरून या युवकावर नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या युवकाचे नाव इरफान बागवान असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2021 1:41 pm

Web Title: nalasopara man arrested for having sex with dogs scsg 91
Next Stories
1 वर्धा : रुग्णांच्या नातेवाईकांना औषधासाठी दहा तास फिरावं लागलं, मात्र…
2 “हे आम्हाला आवडलं नाही,” मोफत लसीकरणावरुन बाळासाहेब थोरांताची राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका
3 “बोलघेवडे, कांगावाखोर…,” फडणवीसांची संजय राऊतांवर अप्रत्यक्ष टीका
Just Now!
X