News Flash

नालासोपाऱ्यात बॅगमध्ये सापडला अज्ञात महिलेचा मृतदेह

शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत

फाइल फोटो (सौजन्य: विकिपिडिया)

नालासोपारा येथे एका बॅगमध्ये ३० ते ३५ वयोगटातील महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. नालासोपाऱ्याच्या पूर्वेकडे श्रीराम नगर येथे मृतदेह असणारी ही बॅग सापडली आहे. ही महिला नक्की कोण आहे, तिची हत्या कोणी केली, ही बॅग या ठिकाणी कोणी ठेवली याचा शोध तुळींज पोलीस घेत आहेत.

रविवारी रात्री दहा साडेदहाच्या दरम्यान श्रीराम नगर येथील मुख्य रस्त्यालगत एक बॅग दिसून आली. या काळ्या बॅगमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर तुळींज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेत तो शवविच्छेदनासाठी पाठवला. ही महिला कोण आणि तिची हत्या कोणी व का केला याचा पोलीस तपास करीत आहेत. या परिसरामध्ये पोलीस अधिक तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2021 11:24 am

Web Title: nalasopara unknown women dead body found in bag scsg 91
Next Stories
1 शरद पवार यांच्यावर बुधवारी ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया
2 मोखाडा : घराला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू
3 कुणीही आघाडीत मिठाचा खडा टाकू नये; राऊतांच्या ‘रोखठोक’वरून अजित पवारांनी साधला निशाणा
Just Now!
X