News Flash

नालासोपार्‍यात पुर्ववैमन्यासातून गोळीबार, एक जखमी

आरोपी एकाच दुचाकीवरून फरार झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले

वसई: नालासोपारा पुर्वेच्या मोरेगाव येथे रविवारी रात्री एका पुर्ववैमन्यासातून दोन गटात हिसंक वाद झाला. यावेळी आरोपींनी गावठी कट्टयातून गोळीबार केला. यात एक जण गंभीर जखमी झाला आहे. तुळींज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नालासोपारा पुर्वेच्या मोरेगाव नाक्यावर दोन गटात पुर्ववैमन्यसातून वाद झाला. रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.

यावेळी आरोपींनी गावठी कट्यातून चार गोळीच्या फैरी झाडल्या. त्यात बळीराम गुप्ता याला दोन गोळ्या लागल्या तर राजकुमार गुप्ता याच्यावर कोयत्याने वार कऱण्यात आले. गुप्ता याला प्राथमिक उपचारासाठी पालिकेच्या तुळींज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी कांदिवलीच्या शताब्दी रुगणालयात हलविण्यात आले आहे.

जखमी गुप्ता याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, असल्याचे पोलिसांनी सांगितले. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी हजर होते. आरोपी एकाच दुचाकीवरून फरार झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2021 11:48 pm

Web Title: nalasopartra shooting one injured akp 94
Next Stories
1 Coronavirus – राज्यात दिवसभरात ४ हजार ९२ करोनाबाधित रुग्णांची वाढ
2 राज्यात औंध येथे ६०० कोटी रुपये खर्चून अद्ययावत साथरोग रुग्णालय!
3 …प्रत्येक चाकात अनेक छिद्रे; चंद्रकांत पाटलांची ठाकरे सरकारवर टीका
Just Now!
X