02 March 2021

News Flash

कोकणात पाणी वाचविण्याची चळवळ उभारल्यास ‘नाम’ची मदत  -नाना पाटेकर

नदी-नाले, धरणातील गाळ काढून गाव समृद्ध करण्यासाठी गावानेच पुढाकार घेतला पाहिजे.

नदी-नाले, धरणातील गाळ काढून गाव समृद्ध करण्यासाठी गावानेच पुढाकार घेतला पाहिजे. त्याला नाम फाउंडेशन सहकार्य करेल, असे ‘नाम फाउंडेशन’चे संस्थापक नाना पाटेकर यांनी म्हटले आहे. सावंतवाडी महोत्सव शुभारंभाला अभिनेता नाना पाटेकर आले होते. त्या वेळी पाणी प्रश्नावर प्रस्तुत प्रतिनिधीशी ते बोलत होते. कणकवली तालुक्यातील नाटळ गावात लोक एकत्र आले आणि त्यांचा गाव समृद्ध करण्यासाठी नियोजन केले. त्यानंतर ‘नाम फाउंडेशन’चे त्यांनी मार्गदर्शन मागितले. नाटळ नदीतील गाळ काढून योग्य नियोजन केले. त्यामुळे यंदाच्या हंगामात पाणी साठवणूक झाली असल्याची माहिती नाना पाटेकर यांनी दिली. आपण आचरा गावातही येऊन गेलो आहे, असे ते म्हणाले. या वेळी पालकमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. कोकणातील नदी, नाले, धरणे आदींमधील गाळ उपसा झाल्यास पाणीटंचाईचा प्रश्न मिटेल. गाळ उपसा झाल्यानंतर पाणी जास्त साठवणूक होईल. असा विश्वास अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केला. त्यासाठी गावातील लोकांनी एकत्रित येऊन नियोजन केले पाहिजे. त्याला ‘नाम फाउंडेशन’ मार्गदर्शन करेल, असे ते म्हणाले.  मराठवाडा खान्देशात दुष्काळ पडला आहे. पाणी नसल्याने पिकांची होरपळ झाली आहे. त्यासाठी ‘नाम फाउंडेशन’ने मोठा कार्यक्रम हाती घेतला. त्याला यश येत असल्याचे नाना पाटेकर म्हणाले. कोकणात भरपूर पाऊस पडतो. त्या पावसाच्या पाण्याची साठवणूक व्हायला पाहिजे. पूर्वीचे दिवस यायचे असतील तर नदी, नाले, धरणे स्वच्छ व्हायला पाहिजे. त्यासाठी गाळाने भरलेले पाणवठे साफ करून पाणी साठवणूक होण्यासाठी मदत करायला हवी. गावाने यासाठी पुढाकार घ्यायला हवा. त्यासाठी एकजूट महत्त्वाची आहे. एकजूट झाल्यानंतर ‘नाम फाउंडेशन’चे मार्गदर्शन मिळेल, असा विश्वास नाना पाटेकर यांनी व्यक्त केला. पाण्याची बचत फार महत्त्वाची आहे. पाण्यासाठी कोकणात मला काम करायची आवड आहे. मी कोकणातीलच आहे, त्यामुळे कोकणातील लोकांनी आता पाणी वाचविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. आपल्या कृषी समृद्धीसाठी पाणी गरजेचे आहे, असे नाना पाटेकर यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2018 12:06 am

Web Title: nana patekar comment on water scarcity
Next Stories
1 नवीन पिढीत वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवा!
2 राज्याला थंडीचा तडाखा
3 धर्माचे राजकारण करणे चुकीचे – शरद पवार
Just Now!
X