30 September 2020

News Flash

मंदिर बांधण्यापेक्षा गरीबाला दोन घास द्या – नाना पाटेकर

खडकवासला बॅकवॉटरमधील गाळ साफ करण्यासाठी नाम फाऊंडेशनकडून ५ पोकलनची मदत

नाना पाटेकर

यंदा राज्यात दुष्काळ आहे, मराठवाड्यात एक मूठ धान्य आणि एक पेंडी चारा प्रत्येकाने दिला तर मराठवाड्यातील जनावरांना आणि माणसांना हातभार लागेल. नाइलाजाने गावाकडील लोक आज शहरात येत आहेत, ती भिकारी नाहीत. त्यांना भिकाऱ्यासारखी वागणूक देऊ नका असे आवाहन नाना पाटेकर यांनी केले. दिल्लीत शेतकरी मोर्चा निघाला. हे पाहता शेतकऱ्यांना संस्थांनी मदत करावी. कोणतेही सरकार मदत करते मात्र ती कमी पडते तेव्हा सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन मदत करायला हवी असेही ते यावेळी म्हणाले.

राज्य शासनाचा पाटबंधारे विभाग आणि ग्रीन थंब या संस्थेच्या माध्यमातून खडकवासला बॅकवॉटरमधील गाळ साफ करण्याच्या चौथ्या टप्प्याचे आज उद्घाटन करण्यात आले. अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते हे उदघाटन झाले. यावेळी नाम फाऊंडेशनकडून पाच पोकलन या उपक्रमासाठी देण्यात आले. आपण निसर्गाशी छेडखनी केली की निसर्ग आपल्याला तसेच देणार अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

आपल्याकडे राम मंदिरावर चर्चा होते, मात्र दुष्काळावर चर्चा होत नाही असा प्रश्न विचारला असता, नानांनी त्याला सडेतोड उत्तर दिले. कुणी काय करायचे हे त्यांच्यावर आहे. मला जे करावेसे वाटते ते मी करतो. गरीब माणसाच्या तोंडात रोज दोन घास गेले तर ते मला देवळात गेल्यासारखेच वाटेल त्यामुळे तुम्हाला मंदिर बांधयाचे असेल तर बांधा. पण मला जे काम करायचे आहे मी करत आहे असेही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2018 3:29 pm

Web Title: nana patekar speech on drought in maharashtra naam foundation
Next Stories
1 Pune marathon : अपघातात पाय गमावले; मात्र, तरीही ‘तो’ धावला !
2 33rd Pune international marathon : इथिओपियाचा अटलाव डेबेड विजेता
3 संशोधन पत्रिकांसाठी महासंघ स्थापन करण्याबाबत ‘यूजीसी’ विचाराधीन
Just Now!
X