27 February 2021

News Flash

‘नाणार’वरुन शिवसेना तोंडघशी; भूसंपादनाची अधिसूचना रद्द झालेली नाही; मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती

संपादनाची अधिसूचना रद्द करण्याचे अधिकार मंत्र्यांना नाही असे सांगत अधिसूचना अजूनही कायम असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

देवेंद्र फडणवीस (संग्रहित छायाचित्र)

नाणार प्रकल्पासाठीची भूसंपादनाची अधिसूचना रद्द केल्याची घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिले आहे. भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचे अधिकार मंत्र्यांना नाही असे सांगत अधिसूचना अजूनही कायम असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

सोमवारी नाणार प्रकल्पाविरोधात शिवसेनेने सभा घेतली. या सभेत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणारसाठीची भूसंपादनाची अधिसूचना रद्द केल्याची घोषणा केली. त्यामुळे नाणार प्रकल्पाचे आता काय होणार, असा संभ्रम निर्माण झाला. शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. अधिसूचना रद्द करणे हे शिवसेनेचे वैयक्तिक मत असू शकते. अधिसूचना रद्द करण्याचे अधिकार मंत्र्यांना नाही. याबाबतचे सर्वाधिकार उच्चाधिकार समितीकडे आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. उच्चाधिकार समितीच्या बैठकीत योग्य निर्णय घेतला जाईल, महाराष्ट्र व कोकणच्या हिताचा निर्णय घेणार, असे आश्वासनही त्यांनी दिले.

केंद्र शासन, राज्य शासन, भारत पेट्रोकेमिकल, इंडियन ऑइल, हिंदुस्थान पेट्रोकेमिकल यांच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथे जगातील पहिला ग्रीन रिफायनरी प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पास स्थानिकांचा विरोध आहे. शिवसेना, मनसे आणि नारायण राणे यांच्या पक्षानेही या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2018 2:57 pm

Web Title: nanar project minister cant scrap land acquisition ordinance cm devendra fadnavis on shivsenas claim
Next Stories
1 नाणारमधील भूसंपादनाची मूळ अधिसूचना रद्द; सुभाष देसाईंची घोषणा
2 कोकणावर अन्याय करणाऱ्याची राख करु, नाणार प्रकल्पावरुन उद्धव ठाकरेंचा इशारा
3 महाभियोग प्रस्ताव फेटाळण्यासाठी इतकी घाई का ? अरविंद सावंत यांचा भाजपाला सवाल
Just Now!
X