News Flash

नाणार रिफायनरी प्रकल्प विदर्भात आणा

रत्नागिरीच्या नाणार येथील तीन लाख कोटी रुपये गुंतवणुकीच्या रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्प प्रस्तावित आहे.

 

आशीष देशमुख उद्धव ठाकरे यांना भेटले

रत्नागिरी जिल्ह्य़ातील प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध असल्याने हा प्रकल्प विदर्भात हलवण्यात यावा, अशी मागणी काँग्रेस नेते व माजी आमदार आशीष देशमुख यांनी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.

देशमुख यांनी आज मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि औद्योगिक विकासात मागे पडलेल्या विदर्भातील नागपूरच्या औद्योगिक वसाहतीत हा प्रकल्प स्थानांतरित करण्याची विनंती केली. यापूर्वी  देशमुख यांनी २३ एप्रिल २०१९ ला उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी ठाकरे यांनी हा प्रकल्प विदर्भात हलवण्यास सहमती दर्शवली होती हे येथे उल्लेखनीय.

रत्नागिरीच्या नाणार येथील तीन लाख कोटी रुपये गुंतवणुकीच्या रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्प प्रस्तावित आहे. रत्नागिरी येथे हा प्रकल्प करण्यास शिवसेनेचा विरोध आहे. माजी आमदार आशीष देशमुख यांनी हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित  केला होता. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात असा एक प्रकल्प विदर्भात आणण्याबाबत पतंप्रधानांशी चर्चा करणार असल्याचे सभागृहात सांगितले होते. त्याच पुढे काही झाले नव्हते.

हा प्रकल्प विदर्भात आल्यास उद्योगधंद्यांना गती मिळेल. तसेच रोजगार निर्मिती होईल. पानिपत, भटिंडा, दिल्ली, बिना, गोवाहाटी इत्यादी ठिकाणी इनलँड रिफायनरी प्रकल्प आहे. या सर्व रिफायनरी बंदराशी पाईप लाईनने जोडण्यात आल्या आहेत.

ही पाईपलाईन समृद्धी एक्सप्रेस वेच्या बाजूने टाकणे सहज शक्य आहे. सिमेटसाठी लागणार पेटकोक, सिंथेटिक यार्न व डांबर निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल या प्रकल्पातून उपलब्ध होणार आहे,असा दावा देशमुख यांनी केला आहे.

तर ४ रुपयांनी पेट्रोल स्वस्त

पेट्रोल, डिझेल, एलपीजी व विमानाचे इंधन मुंबईहून रेल्वेद्वारे विदर्भात येते. याचा वाहतूक खर्च लिटरला चार रुपये पडतो. त्यामुळे विदर्भात या इंधनाच्या किंमती देशात सर्वाधिक आहेत. विदर्भात दरवर्षी १२ कोटी लिटर इंधन लागते. विदर्भात रिफायनरी आली तर वाहतुकीवर होणारा ४८००० कोटी रुपयांचा खर्च वाचेल व इंधने देखील स्वस्त होतील, असेही देशमुख यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2019 2:10 am

Web Title: nanar refinery project akp 94
Next Stories
1 कुत्र्यांनी पाठलाग केल्याने बिबटय़ाची घाबरगुंडी
2 विरार रेल्वे स्थानकात भटक्या कुत्र्यांचे १२ प्रवाशांना चावे 
3 फळपिकाच्या विमाप्रक्रियेत अडथळे का?
Just Now!
X