05 March 2021

News Flash

तांत्रिक बिघाडामुळे नंद अपर्णा बोट वाढवण किनाऱ्यावर

या बोटीवर १२ खलाशी अडकल्याची माहिती

तांत्रिक बिघाडामुळे नंद अपर्ण बोट वाढवण किनाऱ्यावर लागली. १०० फुटांपेक्षा जास्त लांब आणि ३० ते ४० फूट उंच बोट लागल्याने परिसरात खळबळ माजली. मुंबईत स्टील कॉईल उतरवून सुरतला परतत असताना शनिवारी पहाटेच्या सुमारास या बोटीत बिघाड झाला. डहाणू येथील वाढवण किनाऱ्यावर बोट लागल्याने ती पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. या बोटीवर १२ खलाशी अडकले आहेत. ज्यांच्यापैकी १ जण मुंबईचा आहे तर इतर ११ जण परप्रांतीय आहेत. बोटीच्या मागच्या दोन सुकाणूंपैकी एक सुकाणू तुटलेल्या अवस्थेत आहे. सुरत येथील ही बोट असून कोस्ट गार्ड आणि डहाणू तहसीलदारांना या संदर्भातली माहिती देण्यात आली.

ही बोट पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. काही जणांनी या बोटीचे मोबाईलमध्ये फोटोही काढले काहींनी या बोटीचा व्हिडिओही शूट केला. एवढी मोठी बोट समुद्र किनाऱ्यावर लागलेली पाहून पर्यटकांचे आणि लोकांचे पाय साहजिकच या बोटीकडे वळल्याचं पाहण्यसा मिळालं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2019 2:01 pm

Web Title: nand aprana boat stuck at dahanu wadhawan scj 81
Next Stories
1 भाजपात आमदार, केंद्रीय नेतृत्व ठरवतं तेच मुख्यमंत्री होतात : फडणवीस
2 आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्रिपद देण्यास तयार: देवेंद्र फडणवीस
3 ओबीसींना लोकसंख्येप्रमाणे आरक्षण मिळणार : मुख्यमंत्री
Just Now!
X