वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत नांदेडच्या कापूस संशोधन केंद्रातून विकसित झालेले कपाशीचे एनएचएच ४४ (नांदेड ४४) हे वाण बीजी २ स्वरूपात जनुकीय परावर्तित करण्यात येणार आहे. कृषी विद्यापीठ व महाबीज यांच्यात अलीकडेच या बाबत सामंजस्य करार झाला.
विद्यापीठातर्फे संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर व महाबीजतर्फे उत्पादन महाव्यवस्थापक एस. एम. पुंडकर यांनी या करारावर सह्य़ा केल्या. कुलगुरू डॉ. बी. व्यंकटेश्वरलु, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शालीग्राम वानखेडे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण यांची या वेळी उपस्थिती होती. कुलगुरू व्यंकटेश्वरलु म्हणाले की, एनएचएच ४४ (नांदेड ४४) हे कपाशीचे संकरित वाण विद्यापीठाने १९८४ मध्ये विकसित केले असून, बीटी कपाशीचे वाण येण्यापूर्वी अधिक उत्पादन देणारे असल्यामुळे देशात या वाणाचा सर्वाधिक पेरा होता. हे वाण रसशोषण करणाऱ्या किडींना प्रतिकारक असून, यात पुनर्बहराची क्षमता आहे. हे वाण बीजी २मध्ये परावर्तित केल्यास बोंडअळयास प्रतिकारक्षम होईल. हा सामंजस्य करार विद्यापीठाच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरू शकतो. महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. वानखेडे यांनी, बीजी २मध्ये जनुकीय परावर्तित झाल्यास हे वाण महत्त्वाचे ठरेल, असे सांगितले. प्रा. ए. डी. पांडागळे यांनी सूत्रसंचालन केले.

Salary of West Vidarbha Higher Education Department employees finally deposited
पश्चिम विदर्भातील उच्च शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अखेर जमा; ‘लोकसत्ता’च्या वृत्तानंतर प्रक्रियेला वेग
Savitribai Phule Pune University
‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’मध्ये आता गुद्द्यांची नवी संस्कृती; विद्यार्थी, विद्यार्थी संघटनांतील हिंसक प्रकरणांमध्ये वाढ
Kendriya Vidyalaya
केंद्रीय विद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया सुरू, कधीपर्यंत भरता येणार अर्ज?
IIIT Pune
आयआयआयटी पुणेमध्ये प्रवेशाच्या जागांमध्ये टप्प्याटप्प्याने वाढ, डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांच्या उपस्थितीत उद्या पहिला पदवी प्रदान समारंभ