News Flash

नांदेड: सख्खी विवाहित बहीण आणि तिच्या प्रियकराची हत्या करणाऱ्या भावाला फाशीची शिक्षा

नांदेड जिल्ह्यातील थेरबन येथील सैराट प्रेमी युगुलाचा दोन वर्षांपूर्वी विळ्याने गळा चिरून निर्घृण खून करण्यात आल्याची गंभीर घटना घडली होती

नांदेड: सख्खी विवाहित बहीण आणि तिच्या प्रियकराची हत्या करणाऱ्या भावाला फाशीची शिक्षा

ऑनलाइन लोकसत्ता, नांदेड

नांदेड जिल्ह्यातील थेरबन येथील सैराट प्रेमी युगुलाचा दोन वर्षांपूर्वी विळ्याने गळा चिरून निर्घृण खून करण्यात आल्याची गंभीर घटना घडली होती. या खून प्रकरणात भोकर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम.एस.शेख यांनी एकास फाशी तर दुसर्‍यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली. भोकर न्यायालयात मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्याची पहिलीच घटना असल्याचे सांगितले जात आहे. आरोपींना कोणती शिक्षा सुनावली जाईल, हे पाहण्यासाठी नातेवाईक व नागरिकांनी न्यायालय परिसरात मोठी गर्दी केली होती. परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आल्याने न्यायालय परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.

भोकर तालुक्यातील थेरबन जि.नांदेड येथील पुजा बाबुराव दासरे (22) हिचे भोकर येथील जेठीबा वर्षेवार याच्यासोबत मोठ्या थाटामाटात विवाह झाला होता. लग्नानंतर महिनाभरातच पूर्वीपासून प्रेम असलेल्या गावातीलच इतर समाजाच्या गोविंद विठ्ठल कराळे (25) या युवका सोबत सदरील तरुणी विवाह झाल्यावर पळून गेली. तेलंगणातील मुधोळ तालुक्यातील खरबळा येथे प्रियकराच्या बहिणीकडे राहत असल्याची माहिती पुजाचा भाऊ दिगंबर यास मिळाल्याने त्याने आपला चुलत भाऊ मोहन नागोराव दासरे याला सोबत घेऊन मोटारसायकलवर खरबळा गाठले. या दोघांनी पुजा व गोविंद यास तुमच्या पळून जाण्याने समाजात बदनामी झाली, आता तुमचे लग्न बासर (तेलंगणा) येथे लावतो म्हणून समजावण्याचा प्रयत्न करुन मोटारसायकल वर घेऊन निघाले. परंतु दिगंबरच्या मनात वेगळाच कट शिजत असल्याने त्याने त्याना बासरला न नेता भोकरच्या दिशेने नेले.

तेलंगणा व महाराष्ट्र सीमेवरील दिवशी शिवारातील नाल्यावर दोघांना सोबत घेऊन दिगंबरने सख्खी बहिण पूजा व तिचा प्रियकर गोविंद यास आपल्याजवळील विळ्याने सपासप वार करुन गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची गंभीर घटना दि.23 जुलै 2017 रोजी घडली होती.  सदर घटना आँनर किलिंगची असल्याने गाजली होती.

या निर्घृण खून प्रकरणी भोकर पोलिसांत खूनाचा गुन्हा दाखल करुन पुढील तपास पोलीस निरीक्षक संदिपान शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक सुशील चव्हाण व जमादार नामदेव जाधव यांनी सखोल तपास करुन भोकर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.  भोकर न्यायालयाने 8 साक्षीदार, परिस्थिती जन्म पुरावा व वैद्यकीय अहवाल तपासून तो सिद्ध झाल्याने जिल्हा सत्र न्यायाधीश एम. एस शेख यांनी गुरुवारी आँनर किलिंग प्रकरणी दिगंबर बाबुराव दासरे या अविवाहित तरुणास दुहेरी निर्घृण हत्या प्रकरणी 5 हजार दंड व फाशीची शिक्षा ठोठावली तर दुसरा आरोपी मोहन नागोराव दासरे याला 11 हजार रुपये दंड व जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

या महत्वपूर्ण निकालामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांत दहशत पसरली असून या प्रकरणी सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.रमेश राजुरकर यांनी बाजू मांडली तर आरोपी पक्षातर्फे लातूर येथील विधिज्ञ मोहन जाधव यांनी काम पाहिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 18, 2019 5:46 pm

Web Title: nanded court verdict hang to death to brother who killed sister and her lover sgy 87
Next Stories
1 वडिलांनीच केली दारुड्या मुलाची हत्या, नागपुरातील घटना
2 नवा महाराष्ट्र घडवायचा असल्याने जन आशीर्वाद यात्रा-आदित्य ठाकरे
3 नवजीवन एक्स्प्रेसमधून पडून दोघांचा अपघाती मृत्यू
Just Now!
X