01 October 2020

News Flash

नांदेडमध्ये दाम्पत्यावर धारदार शस्त्राने हल्ला; पत्नीचा मृत्यू, पती गंभीर जखमी

काम आटोपून घरी जाताना धारधार शस्त्रानं हल्ला

संग्रहित छायाचित्र

अर्धापूर तालुक्यातील उमरी येथून मालेगावकडे येत असतांना विजवितरन कंपनीच्या कार्यालयासमोर राष्ट्रीय महामार्गवर पती, पत्नी, मुलगा यांना रस्त्यावर अडवून धारदार शस्त्राने वार केल्याने पत्नी जागीच ठार तर पती गंभीर जखमी झाले असून नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असल्याची माहिती अर्धापूर पोलीसांनी दिली आहे.

उमरी येथून कामे आटोपून सोमवारी सायंकाळी ७-३० वाजता मोटरसायकल घेऊन मालेगाव कडे येत असतांना अज्ञात हल्लेखोरांनी गाडी वरून खाली उतरून छाया रावसाहेब पांचाळ व रावसाहेब पांचाळ व मुलगा मोटार सायकलवरून मालेगाव-अर्धापूर रोडवरील महावितरन कंपनीच्या आॅफिससमोर गाडीवरून येऊन धारदार शस्त्राने वार केल्याने छाया रावसाहेब पांचाळ ह्या जागीच ठार तर रावसाहेब पांचाळ हे गंभीर जखमी झाले असून मुलगा सत्यम रावसाहेब पांचाळ (वय ११) हे घाबरून गेले होते.

त्या मुलाला धिर देत जखमी असलेले रावसाहेब पांचाळ यांंना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे,पोलीस उपनिरीक्षक साईनाथ सुरवशे,जमादार परमेश्वर कदम, हेमंत देशपांडे,शेक मजाज खाॅन, यांनी भेट देवून आरोपीची शोधाशोध सुरु केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2020 4:32 pm

Web Title: nanded crime news deadly attack on married couple wife died husband hospitalised nck 90
Next Stories
1 काम करताना किंचाळण्याची गरज नसते; उद्धव ठाकरेंचं कौतुक करताना रोहित पवारांचा विरोधकांना चिमटा
2 करोनाच्या संकटातही कुपोषण नियंत्रणासाठी जिल्हापरिषद प्रयत्नशील
3 “तुमच्या सर्व निर्णयांना आमचा पाठिंबा”, देवेंद्र फडणवीस यांचं उद्धव ठाकरेंना पत्र
Just Now!
X