नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात मेथीची भाजी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील सात जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली. यातील एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून उर्वरित सहा जणांना पुढील उपचारासाठी नांदेडमधील रुग्णालयात हलवण्यात आले. कोँडीबा गंगाराम कदम (वय ६५वर्ष) असे मृताचे नाव आहे.

उमरी तालुक्यातील कळगाव येथे कोंडीबा गंगाराम कदम यांच्या घरी गुरुवारी सकाळी जेवणात मेथीची भाजी होती. जेवणानंतर घरातील सर्वच सदस्यांनी पोटदुखीचा त्रास सुरु झाला.यानंतर सर्वांना रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर सहा जणांना घरी पाठवण्यात आले. तर कोंडीबा कदम यांची प्रकृती खालावल्याने त्यांचा रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुरुवारी संध्याकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

वाचा: भाज्या धुताना ही काळजी घ्यायला हवी

शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास भागाबाई गणपतराव पुयड ,आनंदा कोडीबा कदम (वय ३०) ,कल्पना कोंडीबा कदम (वय २८) ,पदमीनबाई मारोती कदम (वय ४०) ,श्लोक शिवाजी कदम (वय ४) यांना पुन्हा पोटदुखीचा त्रास सुरु झाला. शेवटी सर्वांना नांदेडमधील रुग्णालयात हलवण्यात आले.