News Flash

अनैतिक संबंधात अडथळा, पतीने केली मुख्याध्यापक पत्नीची हत्या

किनवट तालुक्यातील गोकुंदा येथील शांतिनिकेतन इंग्रजी शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा विजय राठोड यांची गुरुवारी सकाळी हत्या करण्यात आली होती.

प्रतिकात्मक छायाचित्र

नांदेडमधील मुख्याध्यापिका सुरेखा राठोड यांच्या हत्येचे गूढ अखेर उकलले आहे. अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने सुरेखा राठोड यांची त्यांच्याच पतीने हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी पती विजय राठोडला अटक केली आहे.

किनवट तालुक्यातील गोकुंदा येथील शांतिनिकेतन इंग्रजी शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा विजय राठोड यांची गुरुवारी सकाळी हत्या करण्यात आली होती. तीक्ष्ण हत्याराने वार करुन त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेने शहरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला असता सुरेखा यांचे पती विजय राठोड याच्यावर पोलिसांना संशय आला. विजय राठोड हा देखील शिक्षक असून त्याचे एका राजकीय पक्षातील महिला पदाधिकाऱ्याशी अनैतिक संबंध होते. या संबंधात सुरेखा या अडथळा ठरत होत्या. पोलिसांनी विजयची चौकशी केली. यादरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी पती विजय राठोडसह दीर अशोक टोपा राठोड, प्रमोद ऊर्फ अजय थोरात यासह एका महिलेविरोधात गुन्हा दाखल केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2018 2:27 pm

Web Title: nanded headmaster murder case husband killed wife over extra marital affairs
Next Stories
1 रायगडमध्ये ‘शिवशाही’ला अपघात, ३१ प्रवासी जखमी
2 गणेशोत्सवाचे जनक भाऊसाहेब रंगारी नव्हे, पुणे महापालिकेने हटवला उल्लेख
3 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
Just Now!
X