19 September 2020

News Flash

नांदेडात माताच झाली वैरीण, तीन वर्षीय चिमुकल्याचा आईने केला खून

खून केल्यानंतर मृतदेह गटारातील घाण पाण्यात टाकून दिला

प्रतिकात्मक छायाचित्र

रागाच्या भरात आईनेच आपल्या पोटच्या तीन वर्षीय चिमुकल्याचा गळा आवळून खून केला.  ही धक्कादायक घटना नांदेडमध्ये घडली आहे.  खून करून मृतदेह गटारात फेकल्यामुळे माता की वैरीण असा सवाल स्थानिक करत आहेत. येथील मालटेकडी भागात शुक्रवारी हा प्रकर समोर आला. या प्रकरणी मुलाच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर विमानतळ पोलिसांनी सोमवार दि. ९ रोजी गुन्हा दाखल केला आहे.

नांदेड शहरातील सांगवी परिसरातील बाबानगर भागात राहुल कोंडीबा गहुबळे हे वास्तव्यास आहेत. ते मेकॅनिकचा व्यवसाय करतात गुरुवारी कामानिम्मीत बाहेर गेले. त्यावेळी त्यांची पत्नी कांंचन राहुल गहुबळे हीने रागाच्या भरात आपला तीन वर्षीय मुलगा दिवेश ह्याचा पांढर्‍या रंगाच्या पट्टीने गळा आवळुन खून केला.

आपल्या घरच्या मंडळींना कांही माहिती होऊ नये यासाठी तिनं तीन वर्षीय चिमुकला दिवेश याचा मृतदेह मालटेकडी भागातील रेल्वे ब्रिजखालील गटारातील घाण पाण्यात टाकून दिला. या घटनेची माहिती तिचा पती राहुल गहुबळे यास समजताच त्याने विमानतळ पोलिस स्थानक गाठून तक्रार दिली. यावरुन विमानतळ पोलिसांनी आरोपी कांचन गहुबळे हिच्या विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक ननवरे हे करीत आहेत.एका मातेनेच चिमुकल्याचा खुन केल्याच्या घटनेने शहरात खळबळ माजली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2020 9:08 am

Web Title: nanded mother killed three years son nck 90
Next Stories
1 शिर्डीत जुळ्या मुलींच्या जन्माचं अनोखं स्वागत, संपूर्ण हॉस्पिटलला विद्युत रोषणाई करत कुटुंबाचं सेलिब्रेशन
2 “आई तू इतकी चांगली आहेस मग जिंकली का नाही?”; मुलाच्या प्रश्नावर पंकजा मुंडे म्हणतात…
3 “आम्हाला कोणत्याही पक्षासोबत सरकार स्थापन करण्यात रस नाही”
Just Now!
X