आंध्रप्रदेश तिरुपती तिरुमला येथून एका १६ महिन्याच्या चिमुकल्याचे अपहरण करून आणलेल्या आरोपीस माहूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विश्वंभर ईबीतवार असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान श्रीक्षेत्र माहूर येथील रेणुकादेवी मंदीर गडाच्या पायथ्याशी एका लहान बालकाला संशयीतरित्या घेऊन फिरणाऱ्या व्यक्तीची माहिती माहूर पोलिसांना दत्ता खुळखुळे यांनी दिली. याप्रकरणी माहूर पोलिसांनी आरोपी विश्वंभर ईबीतवार याला ताब्यात घेऊन चौकशी केली. मात्र, त्याने काहीही सांगण्यास नकार दिला.
दरम्यान, त्याच्याजवळील फोन ताब्यात केला असता, त्यावरील कॉल डिटेल्सवरून बालकाची माहिती तिरुमलातील व्यक्तीला दिली. त्यानंतर आरोपी विश्वंभर ईबीतवार याने तिरुपती तिरुमला आंध्रप्रदेश येथून १६ महिन्याच्या बालकाचे अपहरण करून आणल्याची कबुली दिली आहे. यानंतर माहूर पोलिसांनी तिरुमला पोलिसांना संपर्क केले असता या लहान बालकाची मिसिंग तक्रार तिरुमला येथे दाखल असल्याची खात्री झाली. त्यानंतर बालकाच्या फोटोवरून ओळख पटली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 30, 2018 10:16 pm