23 January 2018

News Flash

Nanded Mahanagarpalika Result : नांदेडमध्ये पुन्हा ‘अशोकपर्व’, भाजपच्या राज्यातील घोडदौडीला लगाम

नांदेड महापालिकेसाठी बुधवारी ६० टक्के मतदान झाले होते.

मुंबई | Updated: December 27, 2017 6:36 PM

महापालिका स्थापन झाल्यापासून नांदेडमध्ये काँग्रेसची सत्ता आहे.

मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष व मंत्रिमंडळातील १० मंत्र्यांचा ताफा राबूनही नांदेडकरांनी भाजपला नाकारत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या बाजूने पुन्हा एकदा कौल दिला आहे. काँग्रेसने ७१ जागांवर विजय मिळवला असून भाजपला ५ जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर शिवसेनेला केवळ १ जागा मिळाली आहे. ८१ जागांपैकी ७१ जागांवर काँग्रेस तर भाजप ५, शिवसेना एका जागेवर आघाडीवर आहे. तर तीन जागांची मोजणी सुरु आहे. एमआयएमचा काँग्रेसला फटका बसेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. परंतु, या निकालावरून नादेंडकरांनी एमआयएमलाही नाकारल्याचे दिसते. एमआयएम, राष्ट्रवादीला खातेही उघडता आलेले नाही. या निवडणुकीत अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, त्यांनी नांदेडमध्ये ‘अशोकपर्व’च असल्याचे दाखवून देत भाजपच्या राज्यातील घोडदौडीला लगाम घातला आहे.

निवडणूक प्रचारादरम्यान भाजपच सत्ता मिळवणार असा दावा पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांपासून स्थानिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आला होता. पण निकालावरून भाजपच्या राज्यातील घोडदौडीला लगाम लागल्याचे दिसते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ओवेसी बंधूंनी नांदेडमध्ये सभा घेऊन प्रचारात रंगत आणली होती. मंत्री संभाजी पाटील निलंगेकरही नांदेडच्या प्रचारात सक्रीय झाले होते.

शहरातील विकासात्मक कामे काँग्रेसच पूर्ण करू शकते, हा लोकांना विश्वास वाटला. त्यामुळेच त्यांनी आम्हाला स्वीकारले. विश्वासापोटी जनेतेने आम्हाला सत्ता दिली आहे. भाजपने खालच्या पातळीवर जाऊन प्रचार केला. या प्रचाराला नांदेडकरांनी दिलेले हे उत्तर असल्याची प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

दरम्यान, नांदेड महापालिकेसाठी बुधवारी ६० टक्के मतदान झाले होते. महापालिका स्थापन झाल्यापासून नांदेडमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. एकूण २० प्रभागांतील ८१ जागांसाठी मतदान झाले. या निवडणुकीत ५७८ उमेदवार आपले नशीब आजमवत होते.

Updates : 

– प्रभाग ९ मधील काँग्रेसचे विजयी उमेदवार: पूजा पवळे, किशोर स्वामी, मनमितकौर, प्रशांत तिडके

– काँग्रेसने ३० ठिकाणी विजय मिळवला

– प्रभाग १ ड मध्ये शिवसेनेला यश, बालाजी कल्याणकर विजयी

– हा कार्यकर्त्यांचा विजय असल्याची प्रतिक्रिया अशोक चव्हाणांनी दिली आहे.

– काँग्रेस ४७ जागांवर आघाडीवर

– काँग्रेसचे विजयी उमेदवार- बेगम शबाना नासेर, फरहत सुलताना, नागेश कोकुलवार

– निवडणुकीच्या सहा महिन्याआधी एमआयएम सोडून काँग्रेसमध्ये आलेल्या ६ पैकी ४ जण विजयी

– काँग्रेसचे विजयी उमेदवार- फारूख अली खान, अपर्णा नेरलकर

– काँग्रेसचा २१ ठिकाणी विजय

– १२ जागांवर काँग्रेस विजयी

– प्रभाग १९ मध्ये भाजप उमेदवार विजयी, शांता गोरे यांचा विजय

– नांदेड पालिकेत भाजपने खाते उघडले

– काँग्रेसचे विजयी उमेदवार- महेंद्र पिंपळे, जयश्री पावडे, राजीव गोविंद काळे

– अशोक चव्हाण राहत असलेल्या शिवाजी नगर परिसरातही काँग्रेसचे चारही उमेदवार आघाडीवर आहेत.

– प्रभाग ५ मध्येही काँग्रेसचे सर्व उमेदवार विजयी

– प्रभाग ११- काँग्रेसच्या रझिया बेगम विजयी

– काँग्रेस ८ जागांवर विजयी, २८ जागांवर आघाडीवर

– प्रभाग ११- काँग्रेसचे मसूद अहमद खान विजयी

– काँग्रेस २५ तर भाजप ३ जागांवर आघाडीवर

–  प्रभाग ११- काँग्रेसच्या आशिया बेगम अब्दुल हबीब विजयी

– प्रभाग ११ मध्ये काँग्रेसचे चारही उमेदवार विजयी

– प्रभाग ११ मध्ये काँग्रचे सय्यद शेर अली विजयी

– पहिले निकाल लागले असून काँग्रेसचे चार उमेदवार विजयी

–  सुरूवातीच्या टप्प्यात अशोक  चव्हाण यांचा गड कायम राहण्याची शक्यता

– काँग्रेस २२, भाजप एका जागेवर आघाडीवर

– काँग्रेस १७, भाजप ४ तर शिवसेना एका जागेवर आघाडीवर

– गत निवडणुकीत काँग्रेसला ४२, शिवसेना १४, भाजप २, एमआयएम ११ आणि संविधान पार्टीला २ जागा मिळाल्या होत्या.

– शिवसेना २ तर एमआयएम २ जागांवर आघाडीवर

– सुरूवातीचे कल हाती आले असून काँग्रेस १६ तर भाजप ८ जागांवर आघाडीवर

–  प्रथम पोस्टल मतमोजणीला सुरूवात

– सकाळी १०.०५ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली.

–  ३ लाख ९६ हजार ८७२ मतदार होते. ६० टक्के झाले होते मतदान

–  एकूण ५५० मतदान केंद्रांवर मतदान झाले

–  एकूण २० प्रभागांतील ८१ जागांसाठी बुधवारी मतदान झाले. ४१ जागा महिलांसाठी राखीव आहेत

 

First Published on October 12, 2017 10:40 am

Web Title: nanded waghala mahapalika result 2017 live nanded waghala municipal corporation bjp congress shiv sena aimim
 1. J
  jitendra
  Oct 13, 2017 at 8:02 am
  प्रत्येक कमेंट टाकण्यासाठी पैसे मिळणारे, विखारी मनोवृत्तीचे पगारी नोकर कुठे आहेत ? भक्त ( कि मूर्ख ) कुठे आहेत आज....पायाखालची जमीन सरकताना दिसू लागली आहे कि काय ?
  Reply
  1. S
   sanjay dhamdhere
   Oct 12, 2017 at 10:10 pm
   Congratulation ashokrao.चांगली जिरवली
   Reply
   1. C
    c w dixit
    Oct 12, 2017 at 10:00 pm
    फॅक्ट एक महापालिका विजय - आव देश जिकल्याचा - येथे राहुल बाबा आला नव्हता -
    Reply
    1. Shivram Vaidya
     Oct 12, 2017 at 8:24 pm
     भाजपच्या पराभवामध्ये खांग्रेसपेक्षा शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंचाच वाटा मोठा आहे. राज्यात युती सरकारमध्ये आणि केंद्रात एनडीए भाजपच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या शिवसेनेच्या कार्याध्यक्षांनी, भाजप-मोदी आणि फडणवीसांवर, आपल्या वैयक्तिक महत्वाकांक्षेसाठी, स्वार्थासाठी खांग्रेस-राष्ट्रवादी खांग्रेसच्या नेत्यांपेक्षाही जहरी, कडक आणि बेलगाम टीका करण्याचा धडाका लावला आहे. पंधरा वर्षांच्या उपवासा नंतर मिळालेल्या सत्तेच्या संधीचे सोने करण्याऐवजी तिची माती करण्याकडेचा उद्धव ठाकरेंचा कल आहे. त्यासाठी मिळालेली सत्ता गेली तरी हरकत नाही अशा मन:स्थितीत ते आले आहेत. कपाळकरंटेपणा, कर्मदरिद्रीपणा आणि अपरिपक्वपणा याचा त्रिवेणी संगम उद्धव ठाकरेंमध्ये झालेला असल्यामुळे, राज्यातील सरकारचे "दिवस" घालण्याचा मान सुद्धा ते स्वतःशिवाय कोणालाही देणार नाहीत.
     Reply
     1. N
      narendra
      Oct 12, 2017 at 5:22 pm
      प्रामाणिकपणा आणि सभ्यता हेच सर्वांनी लक्षात ठेवावे .शिवराळपणा खोटे आरोप आक्रस्ताळेपणा आणि खालच्या दर्जाचे विनोद यांनी टाळ्या मिळाल्या तरी मत मिळत नाहीत याची प्रचिती सर्वांनी घेतली त्याचप्रमाणे आता सत्ता मिळाल्यावर काँग्रेसने उत्तम कारभार केला भ्रश्टाचाराला थारा दिला नाही तर लोक पुनः त्यांनाच सत्ता देतील पण या विजयाने मुजोरी वाढली आणि भ्रश्टाचार सुरु झाला तर हेच लोक पुढच्या वेळेस त्यांनाही त्यांची जागा दाखवतील हे आत्ता निवडून आलेल्यांनी लक्षात ठेवावे.
      Reply
      1. D
       Dinesh salunke
       Oct 12, 2017 at 4:24 pm
       Ashokrao chavan saheb abhinandan khara vikas pahun khota vikas nanded madhun dhoom thokun plala
       Reply
       1. S
        Sandeep
        Oct 12, 2017 at 3:04 pm
        विश्वास बसत नाहीये कि हीच आपल्या संतांची भूमी आहे?
        Reply
        1. dipak sat
         Oct 12, 2017 at 2:34 pm
         Ata dya ki comments paid IT sell wale tond ka band zalay
         Reply
         1. N
          ncvn
          Oct 12, 2017 at 2:15 pm
          मुंबईत बि.जे.पी.ने करून दख्वाले......सत्तेत राहव्यचे आणि बी.जे.पी वर टीका करावयाची .....हे शिवसनेला नडल आहे......नांदेड मध्ये पण शिवसेनेने बी. जे. पी. वर टीका करून माती खाल्ली आहे...............
          Reply
          1. V
           Vishal
           Oct 12, 2017 at 2:07 pm
           किती हि गडबड!!!! भाजपा ची घौडदौड थांबवायची... एका नगरपालकीचेच्या निर्णयाने पूर्ण राज्यातील घौडदौड थांबवली आहे तुम्ही. कुबेर आल्यापासून का काँग्रेस गेल्यापासून लोकसत्ताला बौद्धिक भिकेचे डोहाळे लागले आहेत.
           Reply
           1. Shriram Bapat
            Oct 12, 2017 at 1:44 pm
            नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांनी भाजपासकट सर्वांचा सुपडा साफ केला. त्यांचे अभिनंदन. पण पुणे, कोल्हापूर, भांडुप येथे भाजपने सर्वांचा सुपडा साफ केला, राष्ट्रवादी आणि मातोश्रीला महाग भाज्यांची झळ पोचणार नाही. मातोश्रीवर मोफत मिळालेल्या भोपळ्याची भाजी , भरीत , घारगे वगैरे मुबलक प्रमाणात. गुजरातमधील पोटनिवडणुकांत भाजपने ७ पैकी ५ जागा मिळवल्या.
            Reply
            1. U
             Ulhas
             Oct 12, 2017 at 12:41 pm
             उर्दू मध्ये नाव कशासाठी?
             Reply
             1. Load More Comments