News Flash

नंदुरबारमध्ये जुगाऱ्यांनी केला पोलीस पथकावर हल्ला

दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी

जुगाऱ्यांचा पोलीस पथकावर हल्ला

नंदुरबार जिल्ह्यातील जुगार अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या विशेष पोलीस पथकावर हल्ला करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. नवापूर तालुक्यातील लक्कडकोट गावात रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली. यामध्ये दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नवापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जुगार अड्ड्यांवर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पथकाला लक्कडकोट गावातील अड्डे बंद आढळून आले. मात्र, एके ठिकाणी पोलिसांनी काही संशयास्पद व्यक्तींना हटकले. तेव्हा या लोकांनी पोलिसांवर थेट हल्ला चढवला. त्यामुळे हे हल्लेखोर जुगाराशी संबंधित असल्याची शक्यता आहे. ही कारवाई होण्यापूर्वी पोलीस दलातीलच काही जणांनी जुगाराचा धंदा चालवणाऱ्यांना त्याबद्दलची माहिती पुरवली असावी, असा संशयही निर्माण झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2017 12:26 pm

Web Title: nandurbar gambaras attack police squad
Next Stories
1 फेसबुकवरील सुसाईड नोटमुळे वाचले तरुणाचे प्राण
2 मालेगावमध्ये भाजप-सेना कार्यकर्त्यांमध्ये राडा
3 दहा लाख शेतकऱ्यांना बोगस म्हणताना लाज कशी वाटत नाही? – अजित पवार
Just Now!
X