22 September 2020

News Flash

रायगडात नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी

रक्षाबंधनाचा सणही घरोघरी साधेपणाने साजरा

संग्रहित छायाचित्र

कोळीबांधवांसाठी अत्यंत महत्वाचा सण असलेला नारळीपौर्णिमा  रायगडात उत्साहात साजरा करण्यात आला. करोनाच्या पार्श्वभुमीवर यावर्षी मिरवणूका न काढताच दर्याला नारळ अर्पण करण्यात आला. रक्षाबंधनाचा सणही घरोघरी साधेपणाने साजरा झाला.

पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो. त्यामुळे कोळीबांधव खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी जात नाहीत. नारळीपौर्णिमेच्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करून समुद्राला शांत होण्याची विनंती करातात व मासेमारीला सुरूवात करतात. या निमित्ताने दरवर्षी मिरवणूका काढल्या जातात. मात्र यावर्षी करोनाचा प्रादुर्भााव लक्षात घेऊन सर्व मिरवणूका रद्द करण्यात आल्या होत्या. मोजक्या लोकांनी समुद्र किनाऱ्यावर जाऊन दर्याला नारळ अर्पण केला.

रक्षाबंधनाचे औचित्य साधून बाजारपेठाही गेल्या काही दिवसांपासून सजल्या होत्या. यंदा बहिणींनी स्वदेशी राख्यांना पसंती दिली. विक्रेत्यांनीही देशी बनावटीच्या राख्या फार मोठय़ा प्रमाणात विक्रीस ठेवल्या होत्या. समाज माध्यमांवरही या सणांच्या शुभेच्छांचे संदेश दिले जात होते. करोनाच्या पार्श्वभुमीवर अत्यंत साधेपणाने हा सण साजरा करण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2020 12:16 am

Web Title: narali purnima celebrated in raigad abn 97
Next Stories
1 शरद पवार, उद्धव ठाकरे यांची अर्जुनासारखी अवस्था!
2 महाराष्ट्रात ८ हजार ९६८ नवे करोना रुग्ण, २६६ मृत्यू
3 सोलापूर जिल्ह्यात दिवसभरात दहा मृत्यू ; १९३ नवे करोना पॉझिटिव्ह
Just Now!
X