29 November 2020

News Flash

“नारायण राणेंची वैद्यकीय तपासणी करायला हवी”

शिवसेना नेत्यांचा नारायण राणेंवर पलटवार

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणाचा भाजपा खासदार नारायण राणे यांनी सडकून समाचार घेतला. मात्र नारायण राणेंनी पत्रकार परिषदेत केलेल्या टीकेला आता शिवसेना नेत्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्याचा एकेरी उल्लेख नारायण राणेंनी करणं गैर आहे. एवढंच नाही तर हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारं आहे असंही शिवसेना नेत्यांनी म्हटलं आहे. तर नारायण राणे यांची मेडिकल तपासणी करण्याची गरज असल्याचा खोचक टोला दादा भुसे यांनी लगावला आहे.

“नारायण राणे यांचा इतिहास आणि भूगोल सगळ्यांनाच माहित आहे. भाजपाचे खासदार नारायण राणे यांचे पत्रकार परिषदेतले हावभाव आणि बोलणं बघता त्यांची वैद्यकीय तपासणी करणं आवश्यक आहे असं दादा भुसे यांनी म्हटलं आहे. नारायण राणे यांचं वय आणि आदित्य ठाकरेंचं वय यामध्ये भरपूर अंतर आहे तरीही नारायण राणेंनी आदित्य ठाकरेंकडून संयम कसा बाळगावा हे शिकलं पाहिजे” असंही भुसे यांनी म्हटलं आहे.

तर मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख हा महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेसा नाही. महाराष्ट्राला एक राजकीय इतिहास आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर आहे. पण १५ आमदार निवडून येणार किंवा सरकार पडणार हे बोललं जात होतं. आजच्या नारायण राणेंच्या पत्रकार परिषदेनंतर महाराष्ट्र हेच ठरवेल की उद्धव ठाकरेंच्या मागे ठामपणे उभं रहायचं असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

वाल्मिका नारायण राणेंचा पुन्हा वाल्या झाल्याची टीका अर्जुन खोतकर यांनी केली आहे. नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांच्या विरोधात अर्वाच्य भाषेत टीका केली. शिवसेनाप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या नारायण राणेंकडून चांगल्या भाषेची अपेक्षा कशी करणार? असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे. दिल्लीतील एनसीबीच्या टीमतर्फे नारायण राणेंची चौकशी केली पाहिजे असंही त्यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2020 7:59 pm

Web Title: narayan rane needs medical test says shivsena leader dada bhuse scj 81
Next Stories
1 मजुरांचा ऊस उत्पादक झाला पाहिजे तेव्हाच खरे समाधान मिळेल – धनंजय मुंडे
2 आत्मदहन करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याचा इचलकरंजीत मृत्यू
3 …नाहीतर मातोश्रीची आतली माहिती बाहेर काढेन, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा