सावंतवाडीपाठोपाठ शनिवारी चिपळूण येथील बठकीचे निमंत्रण न मिळाल्याने घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या राणे समर्थकांना मूळ काँग्रेस समर्थकांना प्रवेश दिला नाही.त्यापाठोपाठ  पोलिसही   घटनास्थळी दाखल झाल्याने राणे समर्थकांना माघार घ्यावी लागली. त्यामुळे सिंधुदुर्गप्रमाणे चिपळूणची बठक हायजॅक करण्याचा राणे समर्थकांचा प्रयत्न अयशस्वी ठरला.

काँग्रेसचे जिल्हा प्रभारी विश्वनाथ पाटील यांच्या उपस्थितीत खासदार हूसेन दलवाई आणि अन्य पदाधिकार्याची बठक चिपळूणच्या ब्राह्मण सहाय्यक संघाच्या सभागृहात झाली. यावेळी काँग्रेसचे शहरप्रमुख परिमल भोसले, युवक काँग्रेसचे अध्यक्ष अजय साळवी, नगरसेवक शौका काद्री, हारून घारे, कुंदन खातू, फैसल पिलपिले,  प्रफुल पिसे, श्री. भालेकर, गणेश भोंदे यांच्यासह चिपळूणमधील राणे समर्थक कार्यकर्त्यांनी बठकीच्या ठिकाणी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना बठकीच्या सभागृहात सोडू नका, अशा सूचना खासदार दलवाई यांनी पोलिसांना दिल्या होत्या. प्रवेशद्वारावरच राणे समर्थक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. आतमध्ये जायला न मिळाल्याने कार्यकत्रे संतापले. त्यांनी घोषणाबाजी केली. त्यांना शह देण्यासाठी सभागृहातून काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणा देण्यास सुरवात केली. त्यामुळे सभागृहाजवळ तणावपूर्ण वातावरण होते. बठकीजवळील बॅनरवर राणे कुटुंबियांचे फोटो आणि नाव नसल्याने समर्थक चांगलेच संतापले होते. हा वाद वाढू नये यासाठी राणे समर्थकांना सभागृहापासून लांब नेण्यासाठी पोलिस आणि दंगल विरोधी पथकाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. सभा लांबल्यामुळे राणे समर्थक सभेच्या ठिकाणाहून माघार घेतली.