21 September 2018

News Flash

अमोल काळेला १४ सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडी

गौरी लंकेश हत्येतील प्रमुख आरोपी अमोल काळे हाही डॉ. दाभोलकर यांच्या हत्याकटात सामील असल्याची माहिती उजेडात आली होती.

संग्रहित छायाचित्र

गौरी लंकेश हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अमोल काळेचा सीबीआयला अखेर ताबा मिळाला असून पुणे न्यायालयाने अमोल काळेला १४ सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येतील आरोपींना अमोल काळेने मदत केल्याचा दावा सीबीआयने न्यायालयात केला.

HOT DEALS
  • Samsung Galaxy J6 2018 32GB Black
    ₹ 12990 MRP ₹ 14990 -13%
  • Moto M 32 GB Gold
    ₹ 10499 MRP ₹ 15999 -34%
    ₹1100 Cashback

गौरी लंकेश हत्येतील प्रमुख आरोपी अमोल काळे हाही डॉ. दाभोलकर यांच्या हत्याकटात सामील असल्याची माहिती उजेडात आली होती. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर संशयित मारेकरी कळसकर आणि अंदुरे यांनी ज्या दुचाकीवरून पळ काढला तिची व्यवस्था काळेने केली होती, अशी माहिती उघड झाली होती. अमोल काळेचा ताबा मिळावा, यासाठी सीबीआयने प्रयत्न सुरु केले होते. अखेर अमोल काळेला सीबीआयने ताब्यात घेतले आणि त्याला गुरुवारी दुपारी पुणे न्यायालयात हजर करण्यात आले.

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सीबीआयने एका बंद डायरीच्या माध्यमातून पुणे न्यायालयासमोर युक्तिवाद सादर केला. तपासात अडथळे निर्माण होत असल्याने मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला न्यायालयात तोंडी युक्तिवाद करु नये, असे आदेश दिले होते. त्यानुसार सीबीआयने एका बंद डायरीच्या माध्यमातून न्यायाधीश एस. ए. सय्यद यांच्या समोर युक्तिवाद सादर केला.

सीबीआयचे वकील विनयकुमार ढाकणे म्हणाले की, दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि लंकेश यांच्या हत्येतील आरोपींना अमोल काळे यांनी मदत केली आहे. षडयंत्र रचणे आणि शस्त्र पुरवण्याच काम अमोल काळेने केले. त्यामुळे अमोल काळेला १४ दिवसांची सीबीआय कोठडी देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

त्यावर आरोपीचे वकील धर्मराज म्हणाले की, सीबीआय आरोपीच्या कोठडीचा गैरवापर करत आहे. त्यांनी १४ दिवसाच्या कोठडीला विरोध देखील दर्शवला. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यावर पुणे न्यायालयाने १४ सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली.

First Published on September 6, 2018 3:12 pm

Web Title: narendra dabholkar murder case amol kale remanded cbi custody till 14 september