News Flash

मोदींंची पुन्हा शिवाजी महाराजांशी तुलना : संजय राऊत भडकले, म्हणाले…

दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या प्रचारात तानाजी सिनेमातील प्रसंगाचा वापर

पंतप्रधान मोदींची पुन्हा छत्रपती शिवाजी पुन्हा तुलना करण्यात आल्याचा प्रकार समोर आल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. “छत्रपती शिवाजी महाराज युगपुरूष आहेत. शिवरायांचा राजकारणासाठी वापर चुकीचा आहे. असा अपमान सहन करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजासंदर्भात शिवसेनेवर ज्यांनी तावातावानं टीका केली. ते यावर काय भूमिका घेणार याची मी वाट बघतोय, अशा शब्दात राऊत यांनी छत्रपती उदयनराजे यांच्यावर टीका केली.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचार आता हळूहळू रंगू लागला आहे. सत्ताधारी आम आदमी पार्टी, भाजपा आणि काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांमध्ये दिल्लीत राजकीय लढत बघायला मिळणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच तान्हाजी सिनेमातील एक प्रसंग मार्फ करून व्हायरल करण्यात आला आहे. या प्रसंगात शिवाजी महाराज यांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा लावण्यात आला आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच तान्हाजी सिनेमातील एक प्रसंग मार्फ करून व्हायरल करण्यात आला आहे. या प्रसंगात शिवाजी महाराज यांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा लावण्यात आला आहे. तर तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यावर अमित शाह यांचा चेहरा लावलेला आहे. ही चित्रफित सगळीकडं व्हायरल झाली आहे. या चित्रफितीवरून पुन्हा वादाला तोंड फुटण्याची चिन्ह दिसत आहेत. यावर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

आणखी वाचा – मोदींची पुन्हा शिवाजी महाराजांशी, तर तान्हाजींची अमित शाहांशी तुलना

खासदार संजय राऊत काय म्हणाले?

“राजकारणासाठी शिवरायांचा वापर करणं चूक आहे. छत्रपती शिवाजी महाराज युगपुरूष आहेत. शिवरायांचा अपमान सहन केला जाणार नाही. हा व्हिडीओ मी संभाजी भिडेंपासून अनेकांना पाठवला आहे. शिवाजी महाराजाविषयी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेवर ज्यांनी तावातावानं टीका केली. त्यांच्या प्रतिक्रियेची मी वाट पाहतोय. शिवसेनेच्या विरोधात सातारा, सांगलीत बंद करणारे आता काय भूमिका घेतात, ते मला बघायचे आहे,” असं संजय राऊत माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2020 10:41 am

Web Title: narendra modi and shivaji maharaj comparison shiv sena leader sanjay raut angry bmh 90
Next Stories
1 बाळासाहेब ठाकरे असते तर हे खपवून घेतलं नसतं; राम कदमांचा आव्हाडांवर हल्लाबोल
2 चार महिन्यांपासून ४०,००० होमगार्ड्सचे थकले मानधन; जवान आंदोलनाच्या पवित्र्यात
3 महाराष्ट्राचा तमाशा आता रंगणार दिल्लीच्या फडावर
Just Now!
X