News Flash

मोदी हे दादा कोंडकेंपेक्षाही थापाडे-सुशीलकुमार शिंदे

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे दादा कोंडके यांच्यापेक्षा थापाडे आहेत अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांची खिल्ली उडवली. पंढरपूर येथे जाहीर प्रचारसभेत

| April 14, 2014 02:40 am

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे दादा कोंडके यांच्यापेक्षा थापाडे आहेत अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांची खिल्ली उडवली. पंढरपूर येथे जाहीर प्रचारसभेत ते बोलत होते.
शिंदे म्हणाले की, मोदी हे चहा विकत होते हे गेले अनेक दिवस आपण ऐकत आलो पण आता ते रेल्वेच्या डब्यात चहा विकत होते असे सांगितले जात आहे, थापा मारायलाही काही मर्यादा असतात. मोदी मराठी अभिनेते दादा कोंडके यांच्यापेक्षाही जास्त थापा मारत आहेत.
गुजरातमध्ये गेलो असताना मोदी चहा विकत होते याची कबुली कोणीही दिली नाही असे सांगून ते म्हणाले की, गोध्राकांडानुंतर मोदींना राजीनामा देण्यास सांगण्यात आले होते पण त्यांनी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपये यांच्या आदेशाचेही पालन केले नाही, त्यामुळे त्यांना सत्ता प्रिय आहे हेच दिसून येते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2014 2:40 am

Web Title: narendra modi liar than dada kondke sushilkumar shinde
Next Stories
1 ‘गुजरात मॉडेल हे टॉफी मॉडेल’!
2 सत्ताकेंद्रित प्रवृत्ती रोखण्यासाठी सामान्य माणूस काय करतो हे दिसेल-शरद पवार
3 राष्ट्रवादीकडून निवडणुकीला जातीय स्वरूप देण्याचा प्रयत्न – फडणवीस
Just Now!
X