News Flash

2019 च्या निवडणुकीत जनता पुन्हा मोदींनाच संधी देणार – रामदास आठवले

शरद पवार यांनी आगामी निवडणुकीत मोदी यांचे सरकार जाणार असल्याच्या केलेल्या मताशी आपण सहमत नसल्याचं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे

2019 च्या निवडणुकीत जनता पुन्हा मोदींनाच संधी देणार – रामदास आठवले
रामदास आठवले

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी निवडणुकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सरकार जाणार असल्याच्या व्यक्त केलेल्या मताशी आपण सहमत नसल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. 2019 च्या निवडणुकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकारला जनता पुन्हा निवडून देईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

देशाच्या विकासासाठी सबका साथ सबका विकास हे मोदींचं सूत्र योग्य ठरले असून त्यानुसार विकासासाठी पुन्हा जनता मोदींच्याच नेतृत्वातील एनडीए सरकारला संधी देणार आहे. देशासमोर एनडीए हाच समर्थ पर्याय आहे. विरोधकांच्या एकजुटीला फुटीचे ग्रहण लागले असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्याच नेतृत्वात देशाला स्थिर आणि विकसनशील सरकार मिळू शकते असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.

माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांचे उत्तुंग व्यक्तीमत्व होते. त्यांचा वारसा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी चालवत असून लोकप्रिय सक्षम प्रधानमंत्री ठरले आहेत. काँग्रेसच्या नेतृत्वातील युपीए सरकारने जे निर्णय घेण्याची हिंमत केली नाही ती हिंमत मोदी सरकारने दाखवली आहे. पाकिस्तानचे कंबरडे मोडणारा सर्जिकल स्ट्राईक मोदी सरकारने केला आहे अशा शब्दांत रामदास आठवलेंनी कौतुक केलं आहे.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी काँग्रेसने इंदूमिलची जमीन देण्यास टाळटाळ केली. मात्र प्रधानममंत्री नरेंद्र मोदींनी त्वरित निर्णय घेऊन जमीन स्माकासाठी हस्तांतरित केली. उज्वला योजना तसेच अनेक सामाजिक न्यायाच्या योजना मोदींच्या नेतृत्वात राबविण्यात आल्या आहेत. रस्ते विकासाचे अनेक प्रकल्प उभारले आहेत. अनेक लोकप्रिय निर्णय मोदी सरकारने घेतले असून आगामी निवडणुकीत जनता नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकारला पुन्हा निवडुन देणार असल्याचा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2018 1:16 pm

Web Title: narendra modi will be in power in 2019 says ramdas athavle
Next Stories
1 शिवस्मारकाच्या कामात अनियमितता, चौकशी करा अन्यथा इतिहास माफ करणार नाही – विनायक मेटे
2 अखेर मुहूर्त मिळाला ! अरबी समुद्रात शिवस्मारकाच्या प्रत्यक्ष बांधकामाला आजपासून सुरुवात
3 ‘अभ्यंगस्नानानंतर फटाके वाजवण्याची परंपरा मोडणार नाही, परिणाम भोगण्याची तयारी’
Just Now!
X