News Flash

स्मार्टफोनचे नकली सुटे भाग विकणाऱ्या दुकानांवर नाशिक पोलिसांची कारवाई

मोबाईल दुकानावर पोलिसांचे छापे, नकली सुटे भाग विक्रेत्यांवर कारवाई

या दुकांनामध्ये मोबाईलचे नकली सुटे भाग विक्रीस ठेवण्यात आले होते. ( संग्रहित छायाचित्र)

स्मार्ट फोनबद्दल प्रत्येकाला आकर्षण असते. प्रत्येकाच्या गरजेनुसार विविध कंपन्यांचे स्मार्टफोन्स बाजारात उपलब्ध असतात. मात्र या कंपनीचे सुटे भाग काहींना आर्थिक दृष्ट्या परवडतात. तर काही ग्राहक नकली फोन अथवा नकली सुटे भागांचा आधार घेतात. यामुळे कंपन्यांचे आर्थिक नुकसान होते. याबाबत वेळोवेळी पोलिसांकडून नकली सुटे भाग व मोबाईल विकणाऱ्या व्यावसायिकांच्या दुकानावर छापे टाकले जातात.

आज (दि.१६) महात्मा गांधी रोडवर अॅपल कंपनीचे नकली सुटे भाग विकणा-या चार दुकांनावर छापा टाकण्यात आला. या छाप्यांमध्ये ५०० पेक्षा अधिक विविध प्रकारचे सुटे भाग जप्त करण्यात आले. बाजारभावाप्रमाणे ही विक्री केली जात होती.

महात्मा गांधी रोडवरील पटेल मोबाईल, आशा मोबाईल, चामुंडा मोबाईल व गोपी मोबाईल या चार दुकांनावर आज दुपारी पोलिसांनी छापे टाकले. या कारवाईत अ‍ॅपल कंपनीचे बनावट मोबाईलचे स्क्रीन गार्ड, गोरील्ला ग्लास, बॅटरी यासह अन्य अ‍ॅसेसरीज अशा सुमारे ५०० वस्तू जप्त करण्यात आल्या. सायंकाळी उशीरा पर्यंत बाजारभावाने त्यांच्या किंमती लावण्याचे काम सुरू होते. या कारवाईनंतर लहान मोठ्या व्यावसायिकानी अशा प्रकारचे नकली सामान दुकानात विक्रीसाठी ठेवू नये असे आवाहन पोलिसांनी यावेळी केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2017 6:28 pm

Web Title: nashik duplicate spare part mobile shop raid nashik police apple samsang
Next Stories
1 नरेंद्र मोदींच्या छायाचित्राच्या निषेधार्थ गांधीप्रेमींचा नाशकात मूक मोर्चा
2 डोंबिवलीतील महिलेला २४ व्या आठवड्यात गर्भपाताची परवानगी, सुप्रीम कोर्टाचा निर्णय
3 ओला आणि उबेर कंपनीच्या वाहन चालक-मालकांचा एक दिवसाचा संप
Just Now!
X