News Flash

नाशिक : प्रथमच दोन महिला जवानांची हेलीकॉप्टर पायलटच्या प्रशिक्षणासाठी निवड

१५ महिला अधिकाऱ्यांनी स्वतःहून आर्मी एविएशनमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती, पण त्यापैकी दोनच महिला अधिकारी पायलट प्रशिक्षणासाठी पात्र ठरल्या.

पायलट होण्यासाठी कठीण परीक्षेला सामोरं जावं लागत असतं.

भारतीय लष्कारातील दोन महिला अधिकाऱ्यांची  हेलीकॉप्टर पायलटच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. राज्यातील नाशिक येथील कॉम्बॅट आर्मी एविएशन ट्रेनिंग स्कूल येथे पहिल्यांदाच हेलीकॉप्टर पायलटच्या रूपात प्रशिक्षणासाठी दोन महिला अधिकाऱ्यांची निवड झाली आहे. भारतीलय लष्कराकडून बुधवारी ही माहिती देण्यात आली आहे.

आतापर्यंत महिला अधिकाऱ्यांना आर्मी एविएशन कॉर्प्समध्ये ग्राउंड ड्यूटीचं काम सोपवलं जात होतं. आर्मी एविएशन कॉर्प्समध्ये पहिल्यांदाच असं होत आहे की, दोन महिला अधिकाऱ्यांना भविष्यात हेलिकॉप्टर उडवण्यासाठी कॉम्बॅट आर्मी एविएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षण दिलं जात आहे. पायलट होण्यासाठी कठीण परीक्षेला सामोरं जावं लागत असतं.

भारतीय लष्कराने याबाबत माहिती देताना सांगितलं की, १५ महिला अधिकाऱ्यांनी स्वतःहून आर्मी एविएशनमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र यापैकी केवळ दोन महिला अधिकाऱ्यांचीच पायलट अॅप्टीट्यूड बॅटरी टेस्ट(PABT) आणि मेडिकलसह कठोर निवड प्रक्रियेनंतर  या पदासाठी निवड झाली. नाशिक येथील प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर या दोन्ही महिला अधिकारी २२ जुलैपर्यंत आर्मी एविशनमध्ये कर्तव्यावर रूजू होतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2021 6:20 pm

Web Title: nashik first time two women army officers selected to undergo helicopter pilot training msr 87
Next Stories
1 पिरंगुट औद्योगिक वसाहत स्फोटातल्या मृतांच्या कुटुंबीयांना तात्काळ मदत द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
2 जनतेनं साथ दिली, तर शरद पवार योग्य निर्णय घेतील -जयंत पाटील
3 “राहुल गांधींसमोर आता भाजपा प्रवेश हाच शेवटचा पर्याय!” निलेश राणेंचा खोचक सल्ला!
Just Now!
X