News Flash

नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्याची कामाच्या ताणाला कंटाळून आत्महत्या

पोलिसांना धारणकर यांच्या मृतदेहाजवळ सुसाईड नोट आढळली. कामाच्या ताणाला कंटाळून आपण आत्महत्या करत आहोत असे धारणकर यांनी या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.

नाशिक महापालिकेत सहाय्यक अधीक्षक म्हणून काम करणाऱ्या संजय धारणकर या अधिकाऱ्याने दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. कामाचा ताण सहन होत नसल्याने आपण आत्महत्या करत आहोत अशी सुसाईड नोट धारणकर यांनी लिहिली आहे. संजय धारणकर हे नाशिक महापालिकेच्या घरपट्टी विभागात सहाय्यक अधीक्षक पदावर काम करत होते. नाशिकमधील गंगापूर रोड भागात असलेल्या आकाशवाणी टॉवरजवळच्या ऋषीराज पार्कमध्ये ते राहात होते.

पोलिसांना धारणकर यांच्या मृतदेहाजवळ सुसाईड नोट आढळली. कामाच्या ताणाला कंटाळून आपण आत्महत्या करत आहोत असे धारणकर यांनी या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. कामाच्या ताण-तणावामुळे मी सोडून जातोय असा उल्लेख या नोटमध्ये आहे. दीर्घ रजेनंतर ते बुधवारीच कामावर रूजू झाले होते. धारणकरांनी आपले आयुष्य संपवण्याचा निर्णय का घेतला? याबाबत नाशिक महापालिकेत चर्चा रंगली होती. गंगापूर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2018 8:11 pm

Web Title: nashik municipal corporation officer commits suicide note says stress at workplace
Next Stories
1 कल्याणच्या एसएम 5 मल्टिप्लेक्समध्ये खाद्यपदार्थ नेऊ न दिल्याने मनसेचा राडा
2 मराठा आरक्षणासाठी अमरावतीमध्ये तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न
3 व्यसनाला कंटाळून महिलेकडून पोटच्या मुलाची कुऱ्हाडीने वार करुन हत्या
Just Now!
X