जेलरोड येथील त्रिवेणी पार्कजवळ महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेला उमदेवार सुरेंद्र उर्फ घाऱ्या शेजवळ याची हत्या करून फरार असलेल्या आणखी तीन संशयितास गुन्हे शाखा युनिट तीनच्या अटक केली. सुरेंद्र शेजवळ याची हत्या केल्यानंतर या कटात सहभागी असलेले सहा संशयित फरार झाले होते. दरम्यान पोलिसांनी जलद गतीने तपासकार्य सुरू केले. काही दिवसांतच तिघा संशयितांना अहमदनगर जिल्ह्यातील देर्डे कोऱ्हाळे याठिकाणाहून अटक केली होती. अर्जुन सुरेश पिवाल, मनोज उर्फ मन्या भारत गांगुर्डे आणि शेखर अहिरे या तिघांना पोलिसांनी अटक केली.

शेजवळ यांची हत्त्या झाल्यावर  तीन जणांना पोलिसांनी अटक केली.  पोलिसांनी  इतर संशयितांचा शोध सुरू केला. अनेक ठिकाणी शोध घेतला. त्यांचा शोध सुरू असताना शेखर सिन्नर बसस्थानकाजवळ येणार असल्याची माहिती शहर गुन्हे शाखेच्या युनिट तीन मधील अधिकारी व कर्मचा-यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सिन्नर येथे जाऊन कारवाई करीत संशयित शेखर प्रकाश अहिरे (रा. जेलरोड) याला अटक केली. त्याचबरोबर अर्जुन सुरेश पिवाल ( रा. जेलरोड) आणि मनोज उर्फ मन्या भारत गांगुर्डे ( जेलरोड) यांना अटक करण्यात आली.

thane, Jitendra Awhad, mumbai High Court, quash the FIR
गुन्हा रद्द करण्यासाठी जितेंद्र आव्हाड उच्च न्यायालयात
Slum Improvement Board, contract,
मुंबई : झोपडपट्टी सुधार मंडळातील ‘कंत्राटा’साठी गोळीबार!
S Somnath
चांद्रयान ४ मोहिमेबाबत इस्रोच्या प्रमुखांकडून मोठी अपडेट; म्हणाले “पुढील टप्पा…”
in Gadchiroli charmoshi taluka s Villagers Oppose Land Acquisition for Iron Project BJP Faces Backlash in Lok Sabha Campaign
भूसंपादनावरून संतप्त ग्रामस्थांकडून भाजपचे ‘बॅनर’ लावण्यास मनाई , प्रचारासाठी गेलेल्या कार्यकर्ते व नेत्यांनाही परत पाठवले

या हत्या प्रकरणातील संशयित अनिल सखाराम डिग्रसकर (रा. जेलरोड), रामभाऊ किसन चव्हाण (रा. कोणार्क नगर), व राहुल देवराम गोतरणे (रा. जेलरोड) यांना यापूर्वीच अटक झाली आहे. सध्या ते तुरुंगात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून फरारी असलेला शेखर अहिरे हा देखील पोलिसांच्या ताब्यात आला असून त्याला लवकरच न्यायालयात हजर करण्यात येईल.