नाशिक जिल्ह्यातील १५ बाजार समित्यांमध्ये बुधवारपासून पुन्हा कांद्याचे लिलाव सुरू होणार आहेत. कांदा खरेदी-विक्रीच्या घाऊक व्यवहारात लेव्हीची वाढीव रक्कम देण्यास नकार देत व्यापाऱयांनी लिलावावर बहिष्कार टाकल्यामुळे सोमवारी जिल्ह्यातील लिलाव होऊ शकले नाहीत. गेल्या आठवड्यात कांद्याची दररोज एक लाख क्विंटल आवक होत होती. मात्र, लिलाव बंद झाल्यामुळे कोट्ववधींचे व्यवहार ठप्प झाले होते. लिलाव ठप्प झाल्यामुळे किरकोळ बाजारातील कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकरणी लक्ष घातल्यानंतर व्यापाऱयांनी सरकारला निर्णय घेण्यासाठी १० जुलैपर्यंतची मुदत दिली.