News Flash

नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटना : मृतांच्या वारसांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर!

नाशिकमधील ऑक्सिजन गळती दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!

नाशिकमध्ये बुधवारी सकाळी घडलेल्या ऑक्सिजन गळती दुर्घटनेमध्ये तब्बल २२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मृतांच्या वारसांना ५ लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. राज्याचे अन्नपुरवठा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली. छगन भुजबळ यांनी बुधवारी दुपारी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. “ही अतिशय दु:खद घटना असून करोनाशी लढा सुरू असताना अशी दुर्घटना होणं हे अतिशय दुर्दैवी आहे”, असं देखील भुजबळ यावेळी म्हणाले. दरम्यान, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

 

या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी सरकारकडून ३ सदस्यीय समितीची स्थापना केली असून यामध्ये एक आयएएस अधिकारी, एक इंजिनिअर आणि एका डॉक्टरचा समावेश आहे. “ऑक्सिजन कसा लीक झाला याची चौकशी करणाऱ्या समितीमध्ये एक इंजिनिअर देखील मुख्यमंत्र्यांनी ठेवला आहे. याची चौकशी झाल्याशिवाय दोषी ठरवता येणार नाही. पण ते शोधणं गरजेचं आहे. त्यासाठी याची उच्चस्तरीय समितीच्या मार्फत चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत”, असं भुजबळ यावेळी म्हणाले.

गंभीर घटना! नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे २२ रुग्णांचा मृत्यू

“ही अतिशय दु:खद घटना घडली आहे. नाशिक महानगर पालिकेचं हे झाकीर हुसेन हॉस्पिटल आहे. इथे १५० रुग्णांची क्षमता आहे. तरी देखील इथे १५७ रुग्ण दुर्घटनेवेळी रुग्णालयात होते. त्यापैकी १३१ रुग्ण ऑक्सिजनवर होते. १५ रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. १५७ रुग्णांपैकी ६३ रुग्णांची प्रकृती चिंताजनक होती”, अशी माहिती यावेळी छगन भुजबळ यांनी दिली.

नाशिक महानगर पालिकेच्या झाकिर हुसेन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनच्या टाकीतून मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची गळती झाल्याची दुर्घटना घडली. ऑक्सिजनचा दाब कमी झाल्यामुळे रुग्णालयात ऑक्सिजनवर असलेल्या २२ रुग्णांचा मृत्यू झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2021 4:14 pm

Web Title: nashik oxygen tank leakage chhagan bhujbal announce 5 lakh help 22 deaths pmw 88
Next Stories
1 मृतांच्या वारसाना तातडीने मदत देणार; राजेश टोपे यांची माहिती
2 “मला प्रियांका गांधींना विचारायचं आहे की त्यांनी…”, देवेंद्र फडणवीसांचा थेट गांधी कुटुंबावर निशाणा!
3 Nashik Oxygen Tank Leak: “निष्काळजीपणाने अजून किती बळी घेणार आहात?”
Just Now!
X