17 January 2021

News Flash

नाशिकमध्ये  बस आणि क्रुझरचा अपघात, ५ ठार; ६ गंभीर जखमी

क्रुझर गाडीचे टायर फुटल्याने अपघात झाल्याची माहिती समोर

नाशिकमध्ये महामार्गावर असलेल्या शिरवडे फाटा या ठिकाणी बस आणि क्रुझरचा अपघात झाला. या अपघातात ५ जण ठार तर ६ जण जखमी झाले आहेत अशी माहिती समोर येते आहे. जखमींवर जवळच्याच खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पिंपळगाव चांदवडजवळ हा अपघात झाला. या अपघातामुळे दोन्ही दिशेची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. क्रूझर गाडी बागलाण तालुक्यातील किकवारी येथील होती यामधले बसलेले सगळे जण एका लग्नासाठी जात होते त्याचवेळी हा अपघात झाला.

चांदवडच्या खडकजांब गावाच्या शिवारातील क्रुझर मुंबई आग्रा महामार्गाने नाशिकच्या दिशेने जात होती. तेव्हा क्रुझरचे टायर फुटले. टायर फुटल्यावर ही गाडी दुभाजक ओलांडून नाशिकहून येणाऱ्या सटाणा आगाराच्या बस क्रमांक एम एच १४ बीटी ४७१६ ला धडकली. या धडकेत क्रुझरमध्ये बसलेल्या ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. तर अपघातामुळे ६ जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर या ठिकाणी लोकांची गर्दी जमा झाली होती. तसेच काही काळ रस्त्याच्या दोन्ही दिशेने वाहतूक कोंडीही झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2018 1:15 pm

Web Title: nashik st bus and car met with an accident 5 people dead
Next Stories
1 प्लास्टिकबंदी अंतर्गत आतापर्यंत ७ लाखांचा दंड वसूल
2 सेवानिवृत्ती वयोमर्यादा वाढविण्याच्या निर्णयाआधीच निवृत्तीचा फटका
3 डुक्कर निर्मूलन मोहीम
Just Now!
X