News Flash

नाशिकमधील शालिमार पेंट कंपनीला भीषण आग, अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

आगीमुळे मुंबई- आग्रा वाहतूक विस्कळीत

जळगाव जिल्हा परिषदेतील पोषण आहारातील मुदतबाह्य साठा प्रकरणातील कारवाईकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत आहे.

नाशिकमधील  शालिमार पेंट कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या तीन गाड्या घटना स्थळी दाखल झाल्या आहेत. नाशिकमधील  गोंदेगाव परिसरातील असलेल्या पेंट कंपनीला ही आग लागली आहे. कंपनीतून आगीच्या ज्वाला तीव्र होत असून स्फोटाचे आवाज देखील येत असल्याचे वृत्त सूत्रांकडून मिळते आहे. ही आग नक्की कशामुळे लागली याबाबत कोणतीही माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. मात्र या आगीमुळे मुंबई- आग्रा वाहतूक विस्कळीत झाल्याचे समजते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2016 10:33 pm

Web Title: nasik fire in shalimar paint factory
Next Stories
1 सातारा-सांगली विधानपरिषद मतदारसंघात ५२ टक्के मतदान
2 सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना क्लीनचिट, जप्त रक्कम ‘लोकमंगल’चीच!
3 मद्यपींना पुन्हा दोनच ‘बाटल्यां’ची मुभा!
Just Now!
X