सन १९७८ साली नाथ पै एकांकिका स्पर्धेचा सुरू झालेला प्रवास आज ३७ वर्षे झाली तरी अव्याहतपणे सुरू आहे. खुल्या गटाच्या स्पर्धेचे स्वरूप बदलून ६ वर्षे लेखककेंद्री एकांकिका महोत्सव संस्थेने आयोजित केला होता; परंतु लेखकांकडून त्याला फारसा चांगला प्रतिसाद येत नसल्याचे लक्षात आल्याने या वर्षीपासून पुन्हा खुल्या गटाची स्पर्धा आयोजित करीत आहोत. स्पर्धा २४ ते ३० डिसेंबर २०१५ या कालावधीत होणार आहे. बक्षिसाच्या रकमेतही भरीव वाढ करण्यात आलेली असून, प्रथम रु. १५,०००/-, द्वितीय रु. १०,०००/- व तृतीय रु. ७,०००/- अशी रोख बक्षिसे असणार असून, वैयक्तिक बक्षिसांच्या रकमेतही वाढ करण्यात आलेली आहे. स्पर्धेचे हे स्वरूप बदलत असताना नवीन, होतकरू रंगकर्मीना या स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या कलागुणांना सिद्ध करण्याची संधी पुन्हा एकदा प्राप्त होणार आहे.
शालेय गटाच्या स्पर्धेच्या स्वरूपात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. शालेय गटासाठी प्रथम रु. ५०००/-, द्वितीय रु. ३,०००/-, तृतीय रु. २,०००/- अशी रोख बक्षिसे आहेत. प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ५ डिसेंबर २०१५ आहे. दोन्ही गटांसाठी प्रवेश फी रु. ५००/- एवढी आहे.
स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी कार्यवाह, वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, कणकवली, द्वारा- स्टेटस फुटवेअर, मुंबई-गोवा महामार्ग, मु. पो. ता. कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग येथे संपर्क साधावा. अगर शरद सावंत यांच्या ९४२२५८४०५४ या भ्रमणध्वनी क्र. किंवा ६ंस्र्ंल्ल्िर३@ॠें्र’.ूे या ई-मेलवर संपर्क साधावा. संस्थेच्या ६६६.ूंँं१ी‘ं१ स्र्१ं३्र२ँ३ँंल्ल.१ॠ या संकेतस्थळावरही स्पर्धेचा प्रवेश अर्ज उपलब्ध आहे. तो डाऊनलोड करून घ्यावा.