News Flash

पं. नाथराव नेरळकर यांचे निधन; मराठवाड्यातील संगीतक्षेत्राचा आधारवड हरपला

औरंगाबादमध्ये झाले निधन; संगीत विश्वावर शोककळा

संग्रहीत छायाचित्र

मराठवाड्यातील ज्येष्ठ गायक व संगीतकार पं. नाथराव नेरळकर (वय ८७) यांचे आज(२८ मार्च, रविवार) औरंगाबादमध्ये निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मराठवाड्यातील संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे. तब्बल सहा दशकांहून अधिक काळ नाथराव नेरळकरांनी मराठवाड्यात संगीत साधना केली होती.

नाथरावांचं जन्मगाव नांदेड  आहे. त्यांच्या पश्चात  अनंत व जयंत नेरळकर ही दोन मुले, हेमा नेरळकर उपासनी ही मुलगी, सून, नातवंडे, असा परिवार आहे.

गानमहर्षी अण्णासाहेब गुंजकर यांच्याकडे त्यांनी संगीत शिक्षणाचे धडे घेतले व त्यानंतर संगीत शिक्षणाच्या प्रचार व प्रसारासाठी त्यांनी आपले आयुष्य व्यतित केले.  २०१५ मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमीची सन्मानाची फेलोशिप मिळाली होती. दिल्लीत त्यांचा सन्मान झाला होता.यानंतर २०१७ मध्ये त्यांना चतुरंग प्रतिष्ठानच्या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2021 2:29 pm

Web Title: nathrao neralkar passed away msr 87
Next Stories
1 “महाराष्ट्रात सरकार उद्धव ठाकरेंचं आहे की, मुस्लिम लीगचं?”
2 ‘बुरा न मानो होली है’ म्हणत संजय राऊतांचं खास ट्विट; निशाणा नेमका कुणावर?
3 …तेव्हा गृहमंत्रीपद शरद पवारांनी देशमुखांकडे दिलं; संजय राऊतांचा गौप्यस्फोट
Just Now!
X