सिंगापूर येथे झालेल्या जागतिक हौशी महिला बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना साक्षी दिनेश चितलांगे हिने विजेतेपद पटकावले. सिंगापूरचे परराष्ट्र व्यवहार व कायदामंत्री के. षण्मुगम यांच्या हस्ते चषक, पदक व रोख १ हजार युरो (८५ हजार रुपये) बक्षीस, याबरोबरच जागतिक बुद्धिबळ संघटना फिडेतर्फे ‘वुमन फिडे मास्टर’ हा किताब देऊन साक्षीला गौरविण्यात आले. जागतिक स्पर्धेत प्रथम येणाऱ्या खेळाडूलाच हा बहुमान देण्यात येतो. स्पर्धेत ३७ देशांमधील खेळाडूंनी सहभाग नोंदविला.
भारताला अजिंक्यपद मिळवून देणारी साक्षी ही हौशी बुद्धिबळपटू. याआधी २००८मध्ये मिताली पाटील हिने ही कामगिरी केली होती. माजी बुद्धिबळ जगज्जेता गॅरी कास्पारोव्ह यांनी या वेळी साक्षीला शुभेच्छा दिल्या. स्पर्धेत या वर्षी महिला खेळाडूंची संख्या जास्त असल्यामुळे महिला व पुरुष अशा गटांत ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत साक्षीने ९पैकी ७ गुण मिळवून विजेतेपदावर आपले नाव कोरले. साक्षीचे आंतरराष्ट्रीय गुणांकन १८०५ असून स्पर्धेत तिने २६ आंतरराष्ट्रीय गुणांची कमाई केली.
या पूर्वी साक्षीने १४ वर्षांखालील गटात सुवर्णपदक, १७ वर्षांखालील गटात रौप्यपदक मिळविले. १७ वर्षे व १९ वर्षे वयोगटातील मुलींच्या गटातही तिने राज्य विजेतेपद पटकावले होते. या यशाबद्दल औरंगाबाद जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष मोरेश्वर सावे, सचिव हेमेंद्र पटेल, आर. डी. पवार, अभिजित दिवे यांनी साक्षीचे अभिनंदन केले.

Mr. Gay Nepal 2024
‘मिस्टर गे नेपाळ २०२४’ चा किताब लक्ष्मण मगर यांनी जिंकला; आता लंडनमध्ये करणार प्रतिनिधित्व
Cash prize from Paris Olympics to gold medal winning athletes
सुवर्णपदकविजेत्या अ‍ॅथलेटिक्सपटूंना पॅरिस ऑलिम्पिकपासून रोख पारितोषिक! जागतिक अ‍ॅथलेटिक्स संघटनेचा निर्णय
pv sindhu
सिंधूची उबर चषक बॅडमिंटन स्पर्धेतून माघार; थॉमस चषकासाठी भारताचा मजबूत संघ
Ayesha Khan, Bigg Boss Fame, Cheers For MS Dhoni During
DC Vs CSK: ‘माही’ला चिअर करणारी ही अभिनेत्री चर्चेत, चेन्नईने सामना गमावला तरीही जिंकली मनं