X
X

मंत्री धनंजय मुंडेंबद्दल नीट बोल अन्यथा जीवे मारू ‘

मारहाण करणाऱ्या कार्यकर्ते हे सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे समर्थक असल्याचा आरोप पांडुरंग नागरगोजे यांनी केला आहे.

भाजप सरपंचाला धमकी ; मारहाणीची चित्रफीत प्रसारित

बीड –   मंत्री धनंजय मुंडे यांच्याविषयी चुकीची पोस्ट समाज माध्यमातून केल्याचा राग मनात धरून कार्यकर्त्यांनी रोहतवाडी ( ता. पाटोदा ) येथील भाजप सरपंचाला बेदम मारहाण केली. लाथा बुक्क्या आणि खुर्ची फेकून मारतानाची चित्रफीत समाजमाध्यमात प्रसारित झाल्याने खळबळ उडाली आहे. मारहाणी नंतर त्या कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडे यांच्याविषयी नीट बोल नाही तर जीवे मारू अशी धमकी दिल्याची माहिती समाज माध्यमातून दिली आहे.

बीड जिल्ह्यातील रोहतवाडी (ता.पाटोदा ) येथील रोहतवाडी गावचे सरपंच पांडुरंग नागरगोजे यांना काही कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची चित्रफीत बुधवार दि.२२ जानेवारी रोजी समाज माध्यमात प्रसारित झाली. भाजपचे काम का करतो, असा जाब विचारून  कार्यकर्त्यांनी खुर्ची आणि लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मारहाण करणाऱ्या कार्यकर्ते हे सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे समर्थक असल्याचा आरोप पांडुरंग नागरगोजे यांनी केला आहे. धनंजय मुंडे यांच्याबद्दल चुकीची पोस्ट टाकली होती म्हणून मारहाण करण्यात आली असा दावाही या कार्यकर्त्यांनी स्वतः हुन समाज माध्यमात पोस्ट टाकून केला. त्याच  पोस्ट मधून सरपंच पांडुरंग नागरगोजे यांना धमकीही देण्यात आली. ‘धनंजय मुंडे यांच्याबद्दल बोलायची लायकी नाही. लायकीनुसार बोलं नाहीतर थेट खुन (३०२) करण्याची धमकी देण्यात आली. याप्रकाराने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

हेच ध्येय दिसतंय पालकांचं , खपवून घेतलं जाणार नाही – पंकजा मुंडे यांचे ट्विट

बीड जिल्ह्यातील शांतता आणि सुख कायम राहावं असं पालकत्व कोणाचं ही मिळावं मग ते कोणीही असो अशी भावना होती. पण सूडाच्या आणि सत्तेच्या लालसेने ग्रासलेले लोक समाजात शांतता ठेऊ शकत नाही. माझ्या कार्यकर्त्याला मारहाण, दबाव, दहशत हेच ध्येय दिसतंय पालकांचं …हे खपवून घेतलं जाणार नाही .. अशी पोस्ट ट्विट करून माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्षरित्या मंत्री धनंजय मुंडे यांना इशारा दिला आहे.

23
Just Now!
X
X