News Flash

पेट्रोल, गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निदर्शने

पेट्रोलचा दर शंभरच्या पुढे गेला आहे.

कर्जत : रासायनिक खते, डिझेल, पेट्रोल व गॅस याची दरवाढ केल्याबद्दल कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देत निषेध करण्यात आला

भाव वाढ कमी न केल्यास आंदोलन करू असा इशारा देणार निवेदन कर्जत तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस व राष्ट्रवादी शहर काँग्रेस यांच्या वतीने तहसीलदार नानासाहेब आगळे यांना दिले. या वेळी शहराध्यक्ष सुनील शेलार, युवकचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे, युवक शहराध्यक्ष विशाल मेहत्रे, महिला आघाडीच्या अध्यक्षा मनीषा सोनमाळी, कार्याध्यक्षा डॉ शबनम इनामदार, भास्कर भैलुमे, सचिन मांडगे, सचिन लांडगे, सचिन धांडे, राहुल खराडे उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील शेलार म्हणाले, की केंद्रातील भाजपचे सरकार हे सर्व नागरिकांवर सूड घेत आहे शेतकरी व सर्वसामान्य गोरगरीब जनता यांना केंद्रातील भाजपचे सरकार वेठीस धरत आहे. पेट्रोलचा दर शंभरच्या पुढे गेला आहे. या देशाच्या इतिहासात एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये दरवाढ कोणीही केलेली नव्हती.

डॉक्टर शबनम इनामदार म्हणाल्या, करोनामुळे संपूर्ण देश संकटात आहे अशावेळी सर्व व्यवसाय, व्यापार उद्योग धंदे बंद आहेत. शेतकरी संकटात आहे. महिला अडचणीत आहेत, असे असताना केंद्र सरकारने सर्व देशाला मदत करण्याऐवजी गॅस पेट्रोल डिझेल खाते यांचे भाव वाढवून सर्वसामान्य व गोरगरीब नागरिकांना पिळून काढण्याचे काम एक प्रकारे करत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2021 12:34 am

Web Title: nationalist congress party protests against petrol and gas price hike akp 94
Next Stories
1 विखे यांच्या पाठपुराव्यातून शिर्डीत प्राणवायू प्रकल्प
2 टाईप-१ प्रकारातील मधुमेही मुलांना म्युकोरमायकोसिसचा धोका
3 मराठा आरक्षण आंदोलनात भाजप सहभागी होणार
Just Now!
X