राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने वाढत्या इंधनदरवाढीच्या विरोधात गुरूवारी परभणीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रिक्षा ओढो आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर जिल्हाधिकारी यांना वाढत्या महागाई व इंधनदरवाढी विरोधात निवेदन देण्यात आले.

देशात सर्वात महाग डिझेल व पेट्रोल परभणी जिल्हयामध्ये मिळत असून सध्या इथे डिझेल ७०.३८ पैसे प्रतीलिटर व पेट्रोलचा दर ८०.४१ पैसे प्रतीलिटर आहे. असे सांगत परभणी जिल्ह्याचा विकास झाला नसून केवळ इंधन दर व महागाई वाढीतच जिल्ह्याचा प्रथम क्रमांक आहे. या उदासीन सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महागाई वाढतच आहे, असा आरोपही आंदोलक युवकांनी यावेळी केला.

या आंदोलनाचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे यांनी केले. यावेळी जिल्हा प्रभारी डॉ. संतोष मुंडे, जिल्हाध्यक्ष शांतीस्वरूप जाधव, शहराध्यक्ष किरण तळेकर, पक्षाच्या राष्ट्रीय महिला सचिव सोनालीताई देशमुख, महिला शहराध्यक्षा नंदाताई राठोड, गंगाधर जवंजाळ, अक्षय पाटील, रितेश काळे, सिद्धांत हाके आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.