News Flash

मालवाहतूकदार आणि स्कूल बस चालकांचा आज संप

या संपात स्कूल बस अँड कंपनी बस ओनर्स असोसिएशनही सहभागी होणार असल्याने राज्यातील स्कूल बस व व्हॅन बंद राहणार आहेत.

( प्रतिकात्मक छायाचित्र )

पेट्रोल आणि डिझेल वस्तू व सेवा कराच्या कक्षेत आणावे, इंधनाचे दर सहा महिन्यांतून एकदा निश्चित करण्यात यावेत, अशा विविध मागण्यांसाठी आज देशभरातील मालवाहतूकदारांनी संप पुकारला आहे. या संपात स्कूल बस अँड कंपनी बस ओनर्स असोसिएशनही सहभागी होणार असल्याने राज्यातील स्कूल बस व व्हॅन बंद राहणार आहेत.

इंधनाच्या दरात होणारी वाढ, टोलदरातून सवलत, रस्त्यांवर सरकारी यंत्रणाकडून होणारी लूट बंद करावी अशा विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस शुक्रवारी देशव्यापी चक्काजाम आंदोलनाची हाक दिली आहे. शुक्रवारपासून देशभरातील मालवाहतूकदार या चक्काजाम आंदोलनात सहभागी होणार आहेत. राज्यातील १२ लाख ट्रक आणि टेम्पो या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

खासगी वाहतूकदारांच्या संपात स्कूल बस अँड कंपनी बस ओनर्स असोसिएशनही सहभागी होणार असून त्यामुळे राज्यासह मुंबई आणि परिसरातील विद्यार्थी वाहतूक करणारी वाहने शुक्रवारी बंद राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर पालकांनी आपल्या मुलांना शाळेत सोडावे अशा सूचना शाळा आणि बस चालकांकडून पालकांना देण्यात आल्या आहेत.

स्कूल बस चालकांच्या मागण्या काय?
पेट्रोल, डिझेल वस्तू व सेवा कराच्या कक्षेत आणावे. इंधनाचे दर सहा महिन्यांतून एकदा निश्चित करण्यात यावेत. राज्यातील सर्व टोल नाक्यांवर शाळेच्या वाहनांना टोलमाफी देण्यात यावी. विम्याच्या हप्त्यात कपात करावी. प्रादेशिक परिवहन विभागाकडून होणारी वार्षिक वाहन तपासणी बंद करण्यात यावी. त्याऐवजी शालेय वाहतूक सुरक्षा समितीकडून वाहनांची तपासणी करण्यात यावी. शाळेभोवती वाहने उभी करण्यासाठी पुरेशी जागा मिळावी. रस्ते खड्डेमुक्त करण्यात यावेत, अशा मागण्या शालेय वाहतूकदारांच्या संघटनेने केल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 20, 2018 7:34 am

Web Title: nationwide transporters strike school bus maharashtra aimtc chakka jam fuel hike
Next Stories
1 न्यायाधीशाच्या FB पोस्टला लाइक करणं वकिलाला पडलं महागात
2 निवृत्त न्यायाधीशाच्या घरुन १०० खटल्यांच्या फाइल गायब, सीबीआय चौकशीचे आदेश
3 Jio Monsoon Hungama Offer : आजपासून अवघ्या ५०१ रुपयांत मिळणार नवा फोन
Just Now!
X