केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज(शनिवार) ९३ व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे दिमाखात उद्धाटन झाले. यावेळी शरद पवार यांनी संगीत नाटकाला पाठींबा देण्याची गरज असून, कलावतांच्या अदाकारीचे जतन करणे गरजेचे असल्याचे म्हटले. या संमेलनासाठी रंगभूमीवरील अनेक दिग्गज कलाकार बारामतीत दाखल झाले आहेत. नाट्यक्षेत्राचा आढावा घेताना शरद पवार म्हणाले की, “नाटय कलावतांची कदर करणे गरजेचे आहे त्याचबरोबर नाट्य चळवळीला उत्तम दिशा देण्याकडे लक्ष देण्याचीही गरज आहे. तसेच नाटक कलावंतांनी रंगभूमीला नवे काही देण्याचा विचार वाढीस लावला पाहीजे त्यासाठी उत्तम नाटक चित्रीत होण्याची गरज आहे”.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या भाषणात नाट्यक्षेत्राच्या विकासासाठी सरकार कटीबद्ध असल्याचे म्हटले. शरद पवार यांचा वाढदिवस आणि १२.१२.१२ असा दुहेरी योग साधून हे ९३ वे अखिल भारतीय नाट्यसंमेलन बारामतीत येथे होत आहे.