03 December 2020

News Flash

VIDEO: अनाथांच्या हक्काचा लढा जिंकणाऱ्या तरुणीचा प्रेरणादायी प्रवास

अमृता करवंदेने अनाथांच्या हक्कांचा एक मोठा लढा जिंकला आहे

अमृता करवंदे ही तरुणी स्वत: अनाथ असून अनेक अनाथ मुलांसाठी काम करत आहे. वयाच्या १८व्या वर्षी अनाथाश्रमातून बाहेर पडल्यानंतर अमृताने अनाथ मुलांसाठी काम करण्यास सुरुवात केली. अमृताने अनाथांच्या हक्कांचा एक मोठा लढा जिंकला आहे. सरकारी नोकरी मिळविण्यासाठी अमृताने केलेल्या संघर्षाची दखल घेत राज्य सरकारने सरकारी नोकऱ्यांमध्ये अनाथ मुलांना आरक्षण लागू केले. अनाथांचे आयुष्य सावरण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या अमृताच्या आयुष्याची कहाणीही तितकीच संघर्षपूर्ण आहे. संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरलेली अमृता ही आजच्या काळातील नवदुर्गाच आहे.

‘जागर नवदुर्गांचा’ या नवरात्र विशेष कार्यक्रमाच्या निमित्ताने अमृता करवंदेचा हा प्रवास आपण जाणून घेणार आहोत.

हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला हे युट्यूब व फेसबुकच्या कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2020 9:24 am

Web Title: navdurgancha jagar journey of amruta karvande working for orphans sgy 87
टॅग Navratra
Next Stories
1 औष्णिक वीज केंद्रांमधील उत्पादनात घट
2 अतिवृष्टीग्रस्त सोलापुरातील रडार यंत्रणा बंद
3 पेरलेले उगवतच नाही!
Just Now!
X