अलिबाग : बॅरीस्टर ए. आर अंतुले यांचे पुत्र नाविद अंतुले यांनी नुकतीच केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर या दोघांच्या भेटीने काँग्रेसच्या गोटात नाराजीचा सूर आहे. नाविद आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.

गेली अनेक वर्षे राजकीय घराण्यात असूनही नाविद राजकारणापासून दूर होते. मात्र गेल्या वर्षभरापासून त्यांनी श्रीवर्धन मतदारसंघात आपले बस्तान बसविण्यास सुरुवात केली होती. काँग्रेसच्या अनेक राजकीय सभांमध्ये ते या काळात सहभागी होत असल्याचे दिसून येत होते. श्रीवर्धन मतदारसंघ पुन्हा एकदा काँग्रेसने ताब्यात घ्यावा अशी इच्छा त्यांनी वेळोवेळी व्यक्त केली होती. पण सध्या हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असल्याने त्यांच्या अपेक्षांची फारशी दखल घेतली गेली नाही.

pune dispute within congress marathi news
पुणे काँग्रेसमधील मानापमान नाट्य सुरूच
seven aap mp are invisible
अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर आप संकटात; पक्षाचे १० पैकी सात खासदार गायब
chavadi maharashtra political crisis
चावडी : राणे आणि भुजबळांची वेगळी तऱ्हा
Kailash Gahlot ED custody
अरविंद केजरीवालांनंतर आता आपच्या आणखी एका मंत्र्याच्या मागे ईडीचा ससेमिरा; कोण आहेत कैलाश गेहलोत?

त्यामुळे नाविद यांनी शिवसेनेशी जुळवून घेण्याचे धोरण अवलंबिल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेचे अनेक पदाधिकारी त्यांच्या सातत्याने संपर्कात आहे. याच पाश्र्वभूमीवर त्यांनी नुकतीच आपल्या समर्थकांसह केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांची भेट घेतली. जवळपास दीड तास दोघांमध्ये चर्चा झाली. भेटीतील तपशील समजू शकला नसला, तरी नाविद अंतुले शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा मात्र सुरू झाल्या आहेत.या भेटीनंतर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अंतुले यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याची नाराजी दूर होऊ शकलेली नाही.

‘आम्हाला विकास हवा आहे. त्यासाठी जो पक्ष आम्हाला सहकार्य करेल. त्यांच्यासोबत आम्ही जाऊन काम करू. अनंत गीते हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांची सदिच्छा भेतली. योग्य वेळी पुढील भूमिका स्पष्ट  करीन.’

   – नाविद अंतुले