अमरावती लोकसभा मतदार संघाच्या खासदार नवनीत कौर राणा अलाहाबाद बँक कर्मचाऱ्यांच्या विरोधात चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या. नवनीत राणा यांनी सोमवारी बँक कर्मचाऱ्यांना चांगलेच झापले. मेळघाटमधील चुर्णी गावात असलेल्या अलाहाबाद बँकेत फक्त तीन कर्मचारी कार्यरत आहेच. या बँकेचे जवळपास ३० हजार ग्राहक आहेत.

३० हजार ग्राहक असतानाही फक्त तीन कर्मचारी असल्यामुळे बँकेबाहेर दररोज रांगा लागतात. काहींचे कामे पूर्ण होतात तर काहींना बँकेतून रिकाम्या हाताने जावे लागते. खासदार नवनीत राणा यांच्या या गोष्ट निदर्शनास आल्यानंतर त्यांनी आफला मोर्चा बँकेवर काढला. यावेळी येथील कर्मचाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतलं.

कर्मचाऱ्यांची संख्या वाढवा, अन्यथा मोठं आंदोलन करू असा सज्जड दम यावी त्यांनी दिला. त्या म्हणाल्या की, कोणताही व्यक्ती कितीवेळ रांगेत उभा राहू शकतो? इथं अनेक वयोवृद्ध लोक बँकेबाहेर रांगेत उभे असतात. काहीना आपली कामं सोडून बँकेत रांगेत उभे राहावे लागेते. तरीही कामं होतं नाहीत. लवकरात लवकर आणखी कर्मचाऱ्यांची भरती करा असंही नवनीत राणा म्हणाल्या. अखेरीस संध्याकाळी पाच वाचाता बँकेकडून लेखी स्वरूपात आश्वासन मिळाल्यानंतर नवनीत राणा यांनी आपलं आंदोलन मागे घातले.