News Flash

रामराज्याचे स्वप्न दाखविणाऱ्यांनी देशाला रामभरोसे सोडले – नवाब मलिक

बिहारमधील चौशा शहरातील घटनेवरून केली टीका

करोनामुळे देशात चिंतेचे वातावरण आहे. करोनोमुळे होणारा मृत्यूदर रोखण्याचे मोठं आवाहन प्रशासनासमोर आहे. या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये विचलित करणारा प्रकार घडला आहे. बिहारमधील बक्सममध्ये गंगेच्या किनारी जवळपास ५० नागरीकांच्या मृतदेहांचा ढीग लागला होता. त्यामुळे प्रशासनासहीत नागरीकांची झोप उडाली. हे मृतदेह उत्तर प्रदेशमधून वाहून आल्याची शक्यचा प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यामुळे विरोधकांनी भाजपा सरकारला लक्ष केले आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी घडलेल्या प्रकारावरून भाजपावर टीका केली आहे.

रामराज्याचे स्वप्न दाखविणाऱ्यांनी देशाला रामभरोसे सोडले, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केली. आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे मोठे पुत्र तेज प्रताप यादव यांचे ट्विट रीट्विट करत नवाब मलिक यांनी टीका केली आहे.

काय आहे प्रकरण

बिहारमधील चौशा शहरात सकाळी जेव्हा गावकरी नदी किनाऱ्यावर गावकरी पोहोचले. तेव्हा तेथील चित्र पाहून त्यांना धक्काच बसला. गंगेच्या किनारी मृतदेह वाहून येत होते. गावकऱ्यांनी तात्काळ प्रशासनाला यासंबंधी माहिती दिली. हे मृतदेह करोना रूग्णाचे असल्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. प्रशासनाने हे मृतदेह उत्तर प्रदेश येथून वाहून आले असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.

“४० ते ४५ मृतदेह पाण्यात तरंगत होते,” अशी माहिती चौशा जिल्ह्याचे अधिकारी अशोक कुमार यांनी दिली आहे. अशोक कुमार यावेळी घटनास्थळी महादेव घाट येथे उभे राहून बोलत होते. हे मृतदेह पाण्यात फेकून दिले असावेत, अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे. मृतदेहांची संख्या १०० पर्यंत जाऊ शकते, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.

“हे मृतदेह गेल्या पाच ते सात दिवसांपासून पाण्यात असल्याने फुगले आहेत. आम्ही त्यांची विल्हेवाट लावत आहोत. हे मृतदेह उत्तर प्रदेशातील बहारिच, वाराणसी किंवा अलाहाबाद यापैकी कोणत्या शहरातील आहेत याचा तपास करणार आहोत,” अशी माहिती के के उपाध्याय या अधिकाऱ्याने दिली आहे. “हे मृतदेह येथील नाहीत, कारण आमच्याकडे मृतदेह पाण्यात सोडण्याची परंपरा नाही,” असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान या मृतदेहांमुळे पाण्यातून संसर्ग फैलावण्याची भीती सध्या शहरात आहे. मृतदेहांचा खच लागला असून अनेक श्वानदेखील त्याठिकाणी दिसत होते. यामुळे स्थानिकांच्या मनात खूप भीती आहे. करोनाची लागण होण्याची भीती असून गावकऱ्यांनी हे मृतदेह दफन करण्याची मागणी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2021 9:10 am

Web Title: nawab malik criticizes bjp over bodies found on the banks of river ganga srk 94
Next Stories
1 महाराष्ट्रात ३१ मे पर्यंत लॉकडाउन?
2 लस पुरवठा साताऱ्यात सुरळित तर सांगलीत प्रतीक्षा
3 उजनीच्या पाण्यावरून सोलापूर – पुणे जिल्ह्यात वाद
Just Now!
X