गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली असून या चकमकीत एका नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. घटनास्थळी अजूनही चकमक सुरु असल्याचे समजते.

कुरखेडा तालुक्यातील जंगलात नक्षलवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यानुसार सुरक्षा दलांनी मंगळवारी सकाळी शोधमोहीम राबवली. यादरम्यान नक्षली आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत एका नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात आला.