News Flash

गडचिरोलीमध्ये चकमकीत चार नक्षलवाद्यांसह, तीन नागरिक मृत्युमुखी

* एक पोलिस अधिकारी शहीद गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत

| April 12, 2013 02:38 am

* एक पोलिस अधिकारी शहीद
गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत पोलिसांना चार लक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले. तर, यात एक पोलिस अधिकारी शहीद झाल्याचे समजते. तसेच तीन सामान्य नागरिकांचाही गोळीबारात मृत्यू झाला आहे. गावात सभा सुरु असताना नक्षलवाद्यांच्या एका गटाने गोळीबार करण्यास सुरूवात केली. त्यामुळे परिसरात धांदल उडाली व यात तीन सामान्य नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. तसेच पोलिसांनी नक्षलवाद्यांना दिलेल्या प्रत्युत्तरात एक पोलिस कर्मचारी शहीद झाला.
नुकताच, गेल्या आठवड्यात गडचिरोली जिल्हय़ातील भामरागड तालुक्यात पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सात नक्षलवादी ठार झाले होते. भामरागडपासून ४० किलोमीटरवर असलेल्या भटपर व कवंढे गावांच्या दरम्यान असलेल्या जंगलात ही चकमक उडाली होती. या कारवाईत पोलिसांनी मोठा शस्त्रसाठाही जप्त केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2013 2:38 am

Web Title: naxalite and police war four naxalites and three residents died in gadchiroli
टॅग : Gadchiroli,Naxalites
Next Stories
1 यंदा पूर्वार्धात बरे, तर उत्तरार्धात दगा देणारे पाऊसमान
2 काँग्रेसला शंभरपेक्षाही कमी जागा मिळतील – बाबा रामदेव
3 खावटी कर्जवाटप योजनेला वसुलीच्या समस्येचे ग्रहण
Just Now!
X