छत्तीसगडमध्ये चकमकीत १० नक्षलींचा खात्मा करण्यात आला असतानाच दुसरीकडे गडचिरोलीत नक्षलींचा हिंसाचार सुरूच आहे. ताडगाव येथे पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून नक्षलींनी एका ग्रामस्थाची हत्या केली आहे.

गडचिरोलीतील ताडगाव येथे नक्षलवाद्यांनी एका ग्रामस्थाची हत्या केली. पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून ही हत्या करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. गेल्या २० दिवसांत नक्षलींनी आठ ग्रामस्थांची हत्या केली आहे.

गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात गडचिरोलीतील एका गावालगतच्या इंद्रावती नदीच्या पात्रात नक्षलवाद्यांनी मुक्काम केला होता. त्यानंतर पहाटे झालेल्या चकमकीत ४० नक्षलवादी ठार झाले होते. त्याचा बदला घेण्यासाठी नक्षलींनी काही दिवसांपूर्वी कसनासूर गावात तीन ग्रामस्थांची हत्या केली होती. जहाल नक्षलवादी नंबाला केशव राव ऊर्फ गगन्ना ऊर्फ बसवराजू याने महासचिव पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून नक्षली आक्रमक झाले आहेत. कसनासूरनंतर पोलिसांनी पोलि